वंचित आक्रमक; आंबेडकरांवरील टीका शिवसेनेच्या बांगरांना भोवणार?

आमदार संतोष बांगर यांनी प्रकार आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यावर गंभीर आरोप केला होता.
Santosh Bangar & Prakash Ambedkar
Santosh Bangar & Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

जालना : गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक हजार कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे (shivsena) आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी केला होता. त्यावरुन आता वंचित बहूजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आक्रमक झाली आहे. वंचितच्या वतीने बांगर यांचा पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करण्यात आले आहे.

वंचितचे अमरावतीचे अध्यक्ष शैलेश गवई यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले, या वेळी संतोष बांगर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला. बांगर यांनी प्रकाश आंबेडकर यांची माफी मागावी, अन्यथा राज्यभर आंदोलन करु, असा इशाराही यावेळी वंचितने दिला.

Santosh Bangar & Prakash Ambedkar
Raju Shetty : सरकारला आमचा पाठिंबा, पण सोबत राहायचे की नाही याचा विचार करतोय..

त्याच बरोबर जालन्यातही आंदोलन करण्यात आले. बांगर यांनी जालन्यात येऊन दाखवावे, असा इशारा जालन्याचे वंचितचे अध्यक्ष घुमारे यांनी दिली. वंचितबद्दल अपशब्द वापरणाऱ्या बांगर यांना फाडून खाऊ, असेही ते म्हणाले. स्थानिक शिवसेनेवर देखील त्यांनी टीका केली. शिवसेनेत दम असेल तर लोकशाही मार्गांने वंचितशी लढून दाखवावे, असेही घुमारे म्हणाले. त्याच बरोबर बांगर यांच्या विरोधात कदीम जालना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आल्याची माहिती घुमारे यांनी दिली.

Santosh Bangar & Prakash Ambedkar
Subhash Desai : महाराष्ट्राचा औद्याोगिक विकास कधी थांबला नाही, थांबणारही नाही

दरम्यान, एमआयएमच्या (MIM) महाविकास आघाडीच्या प्रस्तावावरून बांगरांनी प्रकाश आंबेडकरांवर टीका केली होती. वंचित ही भाजपची बी टीम असून प्रकाश आंबडेकर यांनी गेल्या निवडणुकीत एक हजार कोटी रुपये घेतले. तसेच, गेल्या निवडणुकीत प्रचारासाठी त्यांनी हेलिकॉप्टरने प्रवास करत सभा घेतल्या. कुठून हे हेलिकॉप्टर आले हे सुद्धा लोकांना सांगावे लागणार आहे. असेही बांगर म्हणाले होते. भाजपने मत विभाजित करण्यासाठी एमआयएमला पुढे केले. गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचाही त्यासाठीच वापर केला गेला. त्यासाठी एक हजार कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट बांगरांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com