Jitesh Antapurkar News : मराठवाड्यात काँग्रेसला मोठा झटका; आमदार जितेश अंतापूरकरांची पुढची वाटचाल ठरली

Political News : देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला.
jitesh Antapurkar
jitesh AntapurkarSarkaranama
Published on
Updated on

Nanded Congress-BJP Political News : नांदेड जिल्हयात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसमधील चव्हाण यांचे कट्टर समर्थक व देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये प्रवेश करीत धक्का दिला होता. त्यानंतर अनेक काँग्रेसचे (Congress) आमदार भाजप प्रवेश करतील अशी चर्चा होती.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आठ दिवसांपूर्वीच नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाले. या धक्क्यातून काँग्रेस सावरत नाही, तोच भाजपने त्यांना दुसरा राजकीय धक्का दिला आहे. दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना काळात निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत अशोक चव्हाण यांनी जितेश अंतापूरकर यांना निवडून आणले होते.

त्यामुळे भविष्यात जितेश अंतापूरकर यांनी अशोक चव्हाण यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी सायंकाळी त्यांनी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात त्यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित होते.

jitesh Antapurkar
Mahayuti News : महायुतीतील वाद थांबेना! तानाजी सावंतांच्या 'त्या' विधानावर अजितदादांचा आमदार भडकला

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीविषयी जितेश अंतापूरकर यांना विचारण्यात आले असता त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचे वृत्त फेटाळून लावले होते.

मी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याचे स्पष्टीकरण अंतापूरकर यांनी दिले होते. मात्र, आता त्यांनी काँग्रेस पक्षातून राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

jitesh Antapurkar
Mahayuti Politics: बेभान नेते, उथळ वक्तव्यांनी महायुतीचा वारू भरकटला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com