Kalyan Kale News : 'मी थंड हवेच्या ठिकाणी नाही तर कार्यकर्त्यांमध्ये रमतो' ; कल्याण काळेंचा टोला!

Jalna Loksbaha Constituency : मतदानानंतरही काळेंचा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींवर भर.
Kalyan Kale
Kalyan KaleSarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : लोकसभेची उमेदवारी मिळाल्यापासून ते मतदान होईपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. कल्याण काळे मतदारसंघात पायाला भिंगरी लावून फिरत होते. नेत्यांच्या सभा, दौरा, कॉर्नर बैठका, मेळावे, पदयात्रा असे दिवसभराचे भरगच्च कार्यक्रम होते. दोन-तीन आठवड्यांचा प्रचार, उन्हात खेडोपाडी, वाडी, तांडे वस्त्यावर दौरा, उशीर पर्यंतच्या सभा आणि बैठका यातून आता उमेदवारांना उसंत मिळाली आहे.

निवडणुकीचा शीण घालवण्यासाठी अनेक उमेदवार, राजकीय पक्षांची नेते मंडळी थंड हवेच्या ठिकाणी जाण्याच्या बेतात आहेत. कल्याण काळे यांचा मात्र वेगळाच मूड दिसतो. 'ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक लढलो, त्यांना सोडून विदेशात किंवा थंड हवेच्या ठिकाणी रमणारा मी नेता नाही. निवडणूक संपली, मतदान संपले आता कार्यकर्त्यांची गरज नाही, अस माणनाराही मी नाही. त्यामुळे सध्या संपुर्ण जिल्ह्यात दौरे सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीतून मला उर्जा मिळते.' अशा शब्दात लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी मतदानानंतर आपला दिनक्रम सांगितला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kalyan Kale
Jalna Loksbaha : अपक्ष मंगेश साबळे कोणाचा खेळ बिघडवणार ? काळे की दानवे ...

कल्याण काळे(Kalyan Kale) म्हणतात, 'निवडणूक काळामध्ये सर्वच घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार असल्यासारखा माझा प्रचार केला. ज्या कार्यकर्त्याच्या विश्वासावर निवडणूक लढवली त्यांना सोडून कुठे तरी शीण घालवायला निघून जाणे आपल्या मनाला पटत नाही. थंड हवेच्या ठिकाणी रिलॅक्स होण्यासाठी जाणाऱ्यातला मी नेता नाही. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊनच मला खऱ्या अर्थाने आराम मिळणार आहे.'

कल्याण काळे यांनी 25 वर्षापासून भाजपच्या(BJP) ताब्यात असलेला जालन्याचा बालेकिल्ला सध्या दणाणून सोडला आहे. निवडणूक काळात आणि आता त्यांची दिनचर्या कशी आहे, याबाबत सरकारनामा प्रतिनिधीने त्यांना बोलतं केलं.

Kalyan Kale
Beed News: "मला बीडमध्ये येऊ दिलं नाही तर..." मुंडे बहीण-भावाला जरांगे पाटलांचा इशारा; म्हणाले...

यावरे ते म्हणाले 'निवडणूक प्रचारासाठी सकाळी सहा वाजता घराबाहेर पडल्यानंतर रात्री बारा ते दोन या वेळेत घरी यावे लागायचे. या दरम्यान दिवसभर प्रचार रॅली, प्रचार सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका यात दिवस कसा निघून जायचा हे कळतच नव्हते. सकाळी घरातून डब्बा घेऊन जायचं आणि जिथे जमेल तिथे कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या घरी किंवा शेतात जेवण करायचो. कार्यकर्त्यांच्या उत्साहातूनच मोठी उर्जा दररोज मिळत होती. त्यामुळे एनर्जी ड्रिंक घेण्याचे कामच पडले नाही, आजही तीच परिस्थिती आहे.'

याशिवाय 'मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवार आणि बुधवार दोन दिवस दिवस कार्यकर्ते घरी येऊन भेटत आहेत. अजूनही जालना, भोकरदन, जाफराबाद, अंबड, बदनापूर ,सिल्लोड, फुलंब्री, पैठण आदी ठिकाणाहून कार्यकर्ते भेटण्यासाठी येतात. निवडणूक काम संपल्यानंतर रिलॅक्स होण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी जाणारा मी नेता नाही.' असंही ते म्हणाले.

Kalyan Kale
Chhatrapati Sambhajinagar Constituency : संभाजीनगरात जय बाबाजी कोणाचं भलं करणार ?

'मीच डॉक्टर कल्याण काळे उमेदवार म्हणून आपल्या गावात परिसरात प्रचार, प्रसार केला. त्या सर्व कार्यकर्त्यांच्या, सर्व घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटीवर माझा सातत्याने भर असणार आहे. पुढील दहा दिवस मी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीवर भर देणार आहे. यातूनच खऱ्या अर्थाने मला आराम मिळणार आहे. आजही मी घरात निघाल्यानंतर डब्बा सोबत घेऊन कार्यकर्त्यासोबत जेवणाचा आस्वाद घेतो. त्यामुळे कार्यकर्त्यांबरोबर मनसोक्त गप्पागोष्टी मारल्या जातात. त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्यातच मला खरा आनंद मिळतो.' असे काळे यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com