Latur Political : पाटलांच्या `नवरदेवा`ला; देशमुखांचा `बँड` !

Deshmukh V/s Nilangekar News : वर्चस्वाच्या लढाईत पुन्हा एकादा गढी-वाड्यात जाहीरपणे `तुंबळ` राजकीय `बँड` वाजणार आहे.
Sambhaji Patil Nilangekar, Amit Deshmukh News
Sambhaji Patil Nilangekar, Amit Deshmukh Newssarkarnama

Marathwada Political News : निलंग्याचा नवरदेव दिल्लीत ठरतो, तर लातूरचा नवरदेव मुंबईत, पण या वेळी दिल्ली जो नवरदेव ठरवेल त्याचा बँड वाजवण्यास मी निलंग्यात येणार, (Latur Political) अशी उपरोधीक टीका कॉंग्रेस पक्षाचे आमदार अमित देशमुख यांनी, पारंपरिक विरोधक व भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर केली आहे.

Sambhaji Patil Nilangekar, Amit Deshmukh News
Aaditya vs Amit Thackeray: आदित्य-अमित भिडणार; मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंचा कस लागणार

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या काळापासून लातूर (Latur) जिल्ह्यात गढी(देशमुख) आणि निलंगेकर (वाडा) असा गढी-वाड्याचा राजकीय वाद रंगत आला आहे. कालच निलंग्यात तब्बल नऊ वर्षानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा तोही धोंडेजेवणात आयोजित केला होता.

सलग तीन वेळा विधानसभेत निवडणून आलेल्या निलंगेकरांना शह देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून कॉंग्रेसच्या वतीने `नैपथ्य रचना` करण्यास सुरुवात झाली आहे. (Amit Deshmukh) पुरुषोत्तम मासानिमित्त कार्यकर्त्यांना धोडेंजेवण हे जाहीरपणे राजकीय पटलावर यंदा प्रथमच पहायला मिळाले. (Sambhaji Patil Nilangekar) जावायांसाठी धोडेजेवणाची प्रथा आहे, मात्र इथे प्रत्येक कार्यकर्ता कॉंग्रेसचा जावाईच आहे, अशा शब्दात भाजपचे पदाधिकारी टीका करीत आहेत.

याचा संदर्भ घेतच कॉंग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी या धोडेंजेवण कार्यक्रमात, निलंग्याच्या नवरदेवाचा `बँड वाजविण्यास` येणार आसल्याची ग्वाही कार्यकर्त्यांना दिली. या आठवड्यात भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शनिवारी (ता. १२) जनजागर संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. यात लातूर जिल्ह्याच्या विकासासंदर्भात `श्वेतपत्रिका` प्रसिद्ध करणार आहेत.

या मेळाव्यात कृषी,अर्थ, आरोग्य आदी विविध विषयांचे शेकडो तज्ज्ञ जिल्ह्याच्या विकासाबाबत विचार मांडणार आहेत. या जनजागर मेळाव्याच्या निमित्ताने लातूर जिल्ह्यावर भाजपचेच (वाड्याचे) वर्चस्व राहील असा अप्रत्यक्ष निरोप कॉंग्रेसला दिला आहे. या वर्चस्वाच्या लढाईत पुन्हा एकादा गढी-वाड्यात जाहीरपणे `तुंबळ` राजकीय `बँड` वाजणार आहे, हे येणाऱ्या काळात दिसेलच.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com