Aaditya vs Amit Thackeray: आदित्य-अमित भिडणार; मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंचा कस लागणार

Mumbai University Senate Elections: सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच अमित ठाकरे कामाला लागले
Aaditya Thackeray vs Amit Thackeray
Aaditya Thackeray vs Amit ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 10 सप्टेंबरला ही सिनेट निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि विद्यार्थी संघटना जोरदार तयारीला लागल्या आहेत. विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत मनसेचे युवा नेते अमित ठाकरे आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) युवा नेते आदित्य ठाकरे आमने-सामने येणार आहेत.

सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच अमित ठाकरे कामाला लागले असून मनसे विद्यार्थी सेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांची त्यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. मनसेचे मुख्यालय राजगड येथे गुरवारी दुपारी ही बैठक पार पडणार असल्याचे सांगण्यात येत असून अमित ठाकरे पदाधिकाऱ्यांबरोबर काय रणनीती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Aaditya Thackeray vs Amit Thackeray
Mumbai Senate Elections: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक जाहीर; 10 सप्टेंबरला मतदान तर 13 सप्टेंबरला निकाल

दुसरीकडे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंची युवा सेनाही उतरणार असून आदित्य ठाकरे यासाठी कामाला लागले असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सिनेट निवडणुकीत आदित्य आणि अमित ठाकरे भिडणार असून या निवडणुकीत दोघांचा कस लागणार आहे.

या सिनेट निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असून 10 सप्टेंबरला ही निवडणूक पार पडणार आहे. तर 13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दहा जागांसाठी असून या दहा जागांपैकी पाच जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. तर पाच जागा या राखीव प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.

Aaditya Thackeray vs Amit Thackeray
Vikhe Patil On District Division: जिल्ह्यांचे विभाजन होणार की नाही; राधाकृष्ण विखे-पाटलांचे मोठे संकेत !

या सिनेट निवडणुकीसंदर्भातील निवडणूक अधिसूचना बुधवारी मुंबई विद्यापीठाने जारी केली. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली ही सिनेट निवडणूक जाहीर झाल्याने यात कोण बाजी मारतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com