MP Kalyan Kale Angry News : माजींना बोलवता अन् आजींना विसरता; शासकीय कार्यक्रमात डावलल्याने खासदार काळे भडकले!

Congress MP Kalyan Kale expressed his anger after being excluded from a government program : या संदर्भात कल्याण काळे यांनी संताप व्यक्त करत जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण तथा व्यवसाय अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने समक्ष भेटून खुलासा करण्यास सांगितले आहे.
MP Kalyan Kale News
MP Kalyan Kale NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : दोन दिवसांपुर्वी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला(आयटीआय) माजी खासदार तथा स्वातंत्र्यसेनानी दिवंगत पुंडलीक हरी दानवे यांचे नाव दिल्यानंतर नामकरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्यात रंगलेल्या कलगितुऱ्याची चर्चा जिल्हाभरात झाली. पण शासकीय कार्यक्रमाला माजींना बोलावले, पण आजीला विसरले असाच काहीसा प्रकार घडला.

जालन्याचे खासदार डाॅ. कल्याण काळे (Kalyan Kale) यांना या शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते. विशेष म्हणजे माजी केंद्रीय राज्यमंत्री, माजी आमदार आणि भोकरदनचे विद्यमान आमदार या नामकरण सोहळ्याला आवर्जून हजर होते. व्यासपीठावर या दोन माजी मंत्री, लोकप्रतिनिधींना मानाचे स्थान देण्यात आले. पण जिल्ह्याचे खासदार कल्याण काळे यांचा मात्र संबंधित विभागाला विसर पडला? की मग कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी काळे यांना टाळले याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

या संदर्भात कल्याण काळे यांनी संताप व्यक्त करत जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण तथा व्यवसाय अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. (Congress) काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तातडीने समक्ष भेटून खुलासा करण्यास सांगितले आहे. शासकीय कार्यक्रम असून मला का डावलण्यात आले? असा सवाल त्यांनी केला आहे. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून काँग्रेस महाविकास आघाडीचे डाॅ. कल्याण काळे हे एक लाखाहून अधिकचे मताधिक्य घेऊन विजयी झाले होते.

MP Kalyan Kale News
MP Kalyan Kale Met Ajit Pawar : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडत आहे, त्यांचे उपोषण सोडवा!

पाच टर्म सलग खासदार राहिलेल्या भाजपाच्या रावसाहेब दानवे यांचा काळे यांनी आश्चर्यकारकरित्या पराभव केला. काळे यांचा या विजयानंतर जायंट किलर असा मराठवाड्यातील राजकारणात उल्लेख केला जातो. 2009 नंतर तब्बल पंधरा वर्षांनी जालन्यातून लोकसभा लढवणाऱ्या काळे यांनी इतिहास घडवत जिल्ह्यात काँग्रेसला संजीवनी दिल्याचे बोलले जाते. परंतु लोकसभा निवडणूक होऊन नऊ महिने उलटून गेले तरी काळे यांना अद्याप मतदारसंघ आणि प्रशासनावर पकड मिळवता आलेली नाही असे दिसते.

MP Kalyan Kale News
Jalna Political News : पालकमंत्री पंकजा मुंडे यांना राखावी लागणार 'भाऊ'अन् 'दादां'ची मर्जी!

काही दिवसांपुर्वी त्यांनी सोयगाव येथे कृषी विभागाची बैठक बोलावली होती. या बैठकीला कृषी अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळेही काळे चांगलेच संतापले होते. त्यानंतर आता मतदारसंघातील शासकीय कार्यक्रमातूनच खासदारांना डावलण्यात आल्याने काळे भडकले. 'मला का बोलावले नाही'असा जाब कल्याण काळे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे. तसेच दोन दिवसात समक्ष भेटून खुलासा केला नाही, तर हक्कभंग आणण्याचा इशारा देखील काळे यांनी दिला आहे. एकूणच जालना जिल्ह्यातील राजकीय वातावरण यामुळे तापण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com