MP Kalyan Kale Met Ajit Pawar : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडत आहे, त्यांचे उपोषण सोडवा!

Maratha activist Manoj Jarange Patil’s health condition worsens, leading MP Kale to meet Deputy CM Ajit Pawar to discuss the resolution of his hunger strike. : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काळे यांनी आपला पुर्वनियोजित दौरा रद्द करत मुंबईत भेट घेतली. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तातडीने सोडवावे, त्यांच्या प्रकृती खालावत चालली आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले.
MP Kalyan Kale Met Ajit Pawar News
MP Kalyan Kale Met Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

नवनाथ इधाटे

Antarwali Sarati News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत सातव्यांदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवत आहे. त्यांच्यासोबत बसलेल्या इतर मराठा बांधव आणि आंदोलकांना रुग्णालयात भरती करावे लागले. मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या आंदोलकांचे उपोषण तातडीने सोडवावे, अशी मागणी जालन्याचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांनी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची काळे यांनी आपला पुर्वनियोजित दौरा रद्द करत मुंबईत भेट घेतली. यावेळी काळे यांनी त्यांना निवेदन देत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तातडीने सोडवावे, त्यांच्या प्रकृती खालावत चालली आहे, याकडे त्यांचे लक्ष वेधले. तत्पुर्वी काल (ता.27) रोजी कल्याण काळे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. तिथे वैद्यकीय पथक आणि तज्ञ डाॅक्टरांची संख्या वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

काल अंतरवाली सराटीत उपोषणस्थळी भेट देऊन आल्यानंतर आज खासदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांनी थेट मुंबई गाठत अजित पवारांची भेट घेत त्यांना मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी निवेदन दिले. मनोज दादा जरांगे पाटील हे 104 मराठा बांधवांसमवेत मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यांची पूर्तता होण्यासाठी मौजे अंतरवाला सराटी, ता.अंबड, जि.जालना येथे शनिवार, दिनांक 25.01.2025 पासुन आमरण उपोषणाला बसलेले आहेत.

MP Kalyan Kale Met Ajit Pawar News
Manoj Jarange News : वाल्मिक कराडप्रकरणी मनोज जरांगेंची मोठी मागणी; म्हणाले,'पोलीस अधिकाऱ्याला…'

मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे. मराठा समाजाच्या भावना तीव्र असून, असंतोष निर्माण झालेला आहे. मनोज दादा जरांगे पाटील व 104 मराठा बांधव यांच्या खालावत चाललेल्या प्रकृतीची दखल घेऊन हे उपोषण तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी विनंती डॉ.कल्याण काळे यांनी निवेदनाच्या माध्यमातून अजित पवार यांच्याकडे केली आहे.

MP Kalyan Kale Met Ajit Pawar News
Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी महाविकास आघाडी कोर्टात गेली, एकनाथ शिंदेंचा घणाघात

जालन्याचे खासदार डाॅ. कल्याण काळे यांच्या मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांचे हे उपोषण सुरू आहे. गेल्या दीड वर्षातील जरांगे पाटील यांचे हे सातवे उपोषण आहे. ओबीसीतून मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र, हैदराबाद, सातार संस्थानचे गॅझेटच्या नोंदीनूसार सरसकट प्रमाणपत्रांचे वाटप या व इतर मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केल्याप्रमाणे 25 पासून उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, काल पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अंबड येथे रुग्णालयात हलवण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com