औरंगाबाद : शिवसेनेत कुठलेही वाद नाहीत, सगळं काही व्यवस्थीत चाललंय. याच्यात वाद, त्याच्यात संघर्ष हे फक्त सोशल मिडिया आणि पेपरातच आहे, अशा शब्दात रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी खैरे-सत्तार-दानवे वाद फेटाळून लावला. चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) हे आमचे नेतेच आहेत, ते पक्षातील ज्येष्ठ आहेत, आम्ही सगळे त्यांना नेतेच मानतो, असेही भुमरे म्हणाले. (Shivsena)
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील शिवसेनेत अतंर्गत गटबाजी आणि वर्चस्वाची लढाई जोरात सुरू आहे. (Abdul Sattar) विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि नुकतीच झालेली जिल्हा दुध संघाची निवडणूक यातून हे प्रामुख्याने समोर आले. (Marathwada) जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद जुनाच, त्यात आता भुमरे-सत्तार या दोन मंत्र्यांची देखील भर पडली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता शिवसेनेला हे वाद परवडणारे नाहीत. पण नेते काही मागे हटायला तयार नाहीत. चंद्रकांत खैरे नेते असले तरी काहीजण त्यांना नेते मानायला तयार नाहीत. म्हणून त्यांना पक्षातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना याची वारंवार आठवण करून द्यावी लागते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि दूध संघातील निवडणुकीनंतर सत्तार-भुमरे यांच्यात पेटलेला संघर्ष याबाबत विचारले असता भुमरेंनी मात्र असाच कुठलाच वाद नसल्याचे सांगत काल मुंबईतील बैठकीला मी आणि सत्तार सोबत होते, असे स्पष्ट केले. भुमरे म्हणाले, सहकार क्षेत्रातील निवडणुका या पक्षविरहित असतात, तिथे पक्ष नसतोच. त्यामुळे आता त्या निवडणुका झाल्या त्यामुळे वादही संपले.
सत्तारांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. रोहयोची अनेक कामे अजून जिल्ह्यात सुरू व्हायची आहेत. पण ती प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यात होणारच आहेत. मी राज्याचा मंत्री आहे, त्यामुळे काही ठिकाणी कामे सुरु होण्यास विलंब झाला असला तरी ती कामे देखील लवकरच सुरू होतील.
शिवसेनेत वाद असल्याच्या चर्चा या निरर्थक आहेत. त्या फक्त पेपर आणि सोशल मिडियातच दिसतात. प्रत्यक्षात शिवसेनेत सगंळ काही व्यवस्थीत सुरू आहे. येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये आणि एकत्रित काम करणार आहोत, असेही भुमरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.