Nanded Congress : अशोक चव्हाण भाजपत जाताच नांदेडमध्ये काँग्रेस आक्रमक; उचलले मोठे पाऊल

Congress Vs BJP Politics : ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून आलेल्या मोठ्या नेत्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Nanded Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांना लागलीच पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेस नांदेड जिल्ह्यात विकलांग झाल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही पाऊल उचलत उरलेसुरले पदाधिकारी पक्ष उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशामुळे बसलेल्या धक्क्यातून काँग्रेस सावरत आहे. पक्ष निरीक्षकांनी बैठक घेऊन पदाधिकाऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. नांदेड लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. काँग्रेस सक्षम उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress
BSUP Housing Scheme : चाव्या प्रकल्पग्रस्तांना, कब्जा भूमाफियांचा! कल्याण डोंबिवलीत चाललंय तरी काय?

नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने (Congress) अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभानिहाय बांधणी, संघटनात्मक पातळीवर बदल करून मेळावे, बूथ कमेटी सदस्य प्रशिक्षण देऊन निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती. आता अशोक चव्हाणच भाजपत गेल्याने काँग्रेसला पुन्हा एकदा तयारी करावी लागणार आहे.

नांदेड लोकसभा (Nanded) काँग्रेसचा गड मानला जातो. गेल्या निवडणुकीत मात्र काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. काँग्रेसला नांदेडची जागा पुन्हा जिंकणे अवघड झाले आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला नांदेडची जागा सुटणार आहे. जागा आम्ही ताकदीने लढू, असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नांदेडमध्ये काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. काँग्रेसने संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.

भाजपमध्ये जाण्यापूर्वी अशोक चव्हाण व‌ डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्या नावाची नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी या दोन नावांची चर्चा सुरू होती. अशोक चव्हाण भाजपत गेल्याने काँग्रेसची खूप मोठी पंचाईत झाली आहे. माजी खासदार भास्करराव पाटील यांनी अशोक चव्हाण यांना साथ देण्याचे सांगितले आहे.

नांदेड लोकसभा जिंकायची असेल तर काँग्रेसला उमेदवारांसह सगळी तयारी करावी लागणार आहे. माजी आमदार वसंतराव चव्हाण, आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे सध्या वेट अँड वाॅच भूमिकेत आहेत, तर ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून आलेल्या मोठ्या नेत्याला उमेदवारी मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com