Ambadas Danve On Aurangjeb News : औरंगजेबाच्या कबरीचा `संरक्षित स्मारकाचा` दर्जा काढून दाखवा..

Marathwada : हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू आहे.
Ambadas Danve On Aurangjeb News
Ambadas Danve On Aurangjeb NewsSarkarnama

Shivsena : मुगल बादशाह औरंगजेब व टिपू सुलतान यांचे फोटो झळकावणे व व्हाट्सअप स्टेटस ठेवण्यावरून राजकारण सुरू असताना औरंगजेबाचे भूत सत्ताधारीच बाहेर काढत आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. (Ambadas Danve On Aurangjeb News) तर औरंगजेबचा भारतीय जनता पक्षाला एवढाच तिटकारा आहे, तर त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेब याच्या कबरीला असलेल्या संरक्षित स्मारकाचा दर्जा काढवून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले.

Ambadas Danve On Aurangjeb News
Jayant Patil On Ncp Ceremony : '२५ वर्षे लहान कालखंड नाही, अनेक क्रांतीकारी निर्णय..' ; वर्धापन दिनाला जयंत पाटील म्हणाले..

औरंगजेबाचे उदात्तीकरण आणि त्याला सरकारकडून छुपा पाठिंबा दिला जातोय असा आरोप विरोधकांकडून होत असतांना अंबादास दानवे यांनी देखील सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. (Shivsena) अंबादास दानवे यांनी या संदर्भात ट्विट करत सरकारवर निशाणा साधला.

'बाटलीतून भूत' बाहेर काढावे तसा हा औरंग्या सत्ताधारीच आज शिवरायांच्या महाराष्ट्रात उभा करत आहेत. शत्रूची भीती दाखवून मत मागण्याची तुमची जुनी सवय जनता ओळखते.(Aurangabad) मग तो औरंगजेब असो की पाकिस्तान. (Bjp) कारवाईची भाषा करणाऱ्यांनी संभाजीनगरात हे पोस्टर नामांतर आंदोलनात पहिल्यांदा दिसले तेव्हा त्यावर काय कारवाई केली, की विसर पडला तुम्हाला याचा?

अल्पवयीन मुले यात सापडत आहेत, ते स्वतःचा मेंदू वापरून हे कृत्य करणे शक्य वाटत नाही. त्यांचा ब्रेनवॉश करणारी यंत्रणा कोण आहे याकडे 'पार्टी विथ डिफ्रन्स' जाणीवपूर्वक कानाडोळा करते आहे. मांजर डोळे मिटून दुध पिते पण तिला जग पाहत असते, हे विसरू नका.

हनुमंताची साथ कर्नाटकात मिळाली नाही म्हणून महाराष्ट्रात तुमचीच धाव औरंग्याकडे सुरू आहे. स्वतःला सज्जन भासवून दुसऱ्याला दुर्जन म्हणणं फार दिवस चालत नसतं. आम्हाला तर आहेच, तुम्हाला तिटकारा असेल या पापी राजाचा, तर त्याच्या कबरीला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा काढण्याची शिफारस करणारे एक साधे पत्र तुमच्या दिल्लीश्वर दैवताला लिहिण्याची हिम्मत तर दाखवा! असे आव्हान दानवे यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com