Raosaheb Danve On Abdul Sattar : सत्तार टोपी काढण्याची शपथ पूर्ण करणार, रावसाहेब दानवेंचा खोचक पलटवार

Chhatrapati Sambhajinagar Constituency Raosaheb Danve Vs Abdul Sattar : जालना लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
Raosaheb Danve, Abdul Sattar
Raosaheb Danve, Abdul SattarSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar Constituency: जालना लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मी कल्याण काळेंना मदत केली, असे जाहीरपणे सांगत अब्दुल सत्तारांनी दानवेंशी थेट पंगा घेतला आहे.

शिवाय रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचा पराभव झाल्यामुळे 2014 मध्ये टोपी काढण्याची शपथ जाहीर कार्यक्रमात पुर्ण करणार, असे म्हणत सत्तारांनी दानवेंना डिवचलं आहे. यावर दानवे यांनी आज अब्दुल सत्तार यांचा औरंगजेब असा उल्लेख करत पलटवार केला. दानवे म्हणाले, "2014 मध्ये मी पराभूत झालो तर टोपी काढेन म्हणणाऱ्या सत्तारांनी मी निवडून आल्यावर चड्डी काढली का? मग आता जनतेमुळे माझा पराभव झाला असताना त्याचे श्रेय जर कोणी घेत असेल तर ते योग्य नाही."

तसंच अशा औरंगजेबाला मी घाबरणार नाही, मी रणांगणात उतरलो तर यांची झाकी उतरून जाईल, सिल्लोडची जनता जास्त दिवस त्यांच्या झाकीत राहणार नाही, असा सूचक इशारा रावसाहेब दानवेंनी सत्तारांना दिला. तसंच एका वृत्तवाहिनीशी बोलताना दानवे यांनी अब्दुल सत्तार जिथे कुठे टोपी उतरवण्याचा कार्यक्रम ठेवतील तिथे मी जाणार, ताठ मानेने शिवाजी महाराजांच्या आवेशात जाणार. कारण औरंगजेबाला भेटायला कसं जावं लागतं हे मला चांगलं माहिती आहे, त्यांनी फक्त मला बोलवावं, असा इशारा देतानाच दानवे यांनी सत्तारांची तुलना थेट औरंगजेबाशी केली.

"शिवाजी महाराजांनी जसा शत्रूचा कोथळा बाहेर काढला होता, तसा मी या औरंगजेबाचा राजकीय कोथळा बाहेर काढील, तुम्ही त्याची चिंता करू नका. माझा पराभव अब्दुल सत्तार यांच्यामुळे झालेला नाही. जनतेने माझा पराभव केला आहे, त्यामुळे त्यांनी उगाच त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये." असं दानवे म्हणाले. तर आता दानवेंच्या आव्हानाला अब्दुल सत्तार यांच्याकडून काय उत्तर मिळते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Raosaheb Danve, Abdul Sattar
Beed Constituency : निकालानंतर बीड तापलं, पाथर्डी, शिरुरनंतर परळी बंदची हाक; 'हे' आहे कारण

एकूणच जालना (Jalna) लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचा पराभव झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. दानवे यांनी मतदारसंघात आभार दौरा काढत विरोधकांना अंगावर घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार विरुद्ध रावसाहेब दानवे असा संघर्ष भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com