Marathwada Political : लातूरचा औद्योगिक विकास आणि केंद्र म्हणून विकास करण्यासाठी एमआयडीसीमध्ये मेडिकल टेक्नो झोन निर्माण करा, अशी आग्रही मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली. (Latur MIDC News) त्यांनी नुकतीच मुंबईत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.
लातूर (Latur) एमआयडीसीची औद्योगिक केंद्र म्हणून विकास करावा, असेही (Amit Deshmukh) देशमुख म्हणाले. लातूर राज्यात शिक्षणाच्या `लातूर पॅटर्न`साठी ओळखले जाते. परंतु या जिल्ह्याचा औद्योगिक विकास म्हणावा तसा झाला नाही. २०१४ मध्ये राज्यातील भाजप-सेना युती सरकारने लातूर मध्ये मराठवाडा रेल्वे कोच निर्मितीचा प्रकल्प मंजुर केला होता.
यातून मोठ्या प्रमाणात लातूरसह (Marathwada) मराठवाड्यातील इतर भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार होता. परंतु अद्याप या प्रकल्पाला गती मिळालेली नाही. याशिवाय लातूर एमआयडीसीमध्ये इतर कुठलेही मोठे उद्योग येऊ शकलेले नाहीत.
या पार्श्वभूमीवर अमित देशमुख यांनी मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी लातूर एमआयडीसीत नवे उद्योग कसे आणता येतील यावर सविस्तर चर्चा केली. तसेच लातूरचा औद्योगिक केंद्र म्हणून विकास करावा.
यासाठी येथील एमआयडीसी मध्ये बाजारात मागणी असलेल्या उपकरणांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण कल्पना राबवण्याची विनंती केली. याअंतर्गत येथे "मेडिकल टेक्नो झोन" निर्माण करावा, अशी मागणीही देशमुख यांनी या भेटीत केली.
Edited By : Jagdish Pansare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.