गुटखा प्रकरणात बीड शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंवर गुन्हा

(Fir Field Against Shivsena District Chief Beed) गुटखा प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव आल्याने खळबळ उडालेली असतानाच दुसरीकडे गुटखा माफिया महारुद्रमुळे याच्यावर अडीच महिन्यांत गुटखा प्रकरणातील हा तिसरा गुन्हा आहे.
Beed Shivsena District Chief Khande
Beed Shivsena District Chief KhandeSarkarnama
Published on
Updated on

बीड : गुटखा प्रकरणात सत्ताधारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मागच्या वर्षी त्यांच्या मालकीच्या जागेत पत्त्याचा क्लब आढळला होता. मात्र, सदर जागा त्यांनी भाड्याने दिल्याचे सांगीतले होते. सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी ही धाडसी कारवाई करत ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईत ताब्यात घेतलेल्या गुटखा विक्रेत्याने चौकशीत शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव घेतल्याने त्यांचा आरोपीत समावेश झाला आहे.

बीड जिल्ह्यात दहशत आणि माफियाराज वाढल्याचा आरोप भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे नेहमी करत असतात. माफियाराजला सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असल्याचा दावाही त्यांनी अनेकवेळा केला. विशेष म्हणजे या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. आठवडाभरापूर्वीच शहरात आणि जिल्ह्यात सत्ताधारी पक्षांतील नेत्यांचे क्लब आणि अवैध धंदे असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केला होता.

केजचे सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मंगळवारी केज तालुक्यातील नांदूरघाट येथे दोन ठिकाणी छापे मारले. त्यानंतर बीडमधील दोन गोदामांचीही त्यांनी झडती घेतली. मंगळवारी सायंकाळी चंद्रकांत रामेश्वर कानडे याच्या दुकानावर छापा टाकला. याशिवाय, रामहरी वैजीनाथ जाधव याच्या दुकानावरही छापा टाकला. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

चंद्रकांत कानडे याने अन्य तिघांकडून हा गुटखा आल्याचे सांगितले, तर जाधवने दोन साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार, केज ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले. दरम्यान, चंद्रकांत कानडेकडे आढळलेल्या गुटख्याचे धागेदोरे गुटखा माफिया महारुद्र मुळे, शेख वसीम शेख सिराज व शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यापर्यंत असल्याचे चौकशीत समोर आले. त्यामुळे आरोपींच्या यादीत कुंडलिक खांडे यांचेही नाव समाविष्ट झाले.

चंद्रकांत कानडे याने चौकशीत दिलेल्या माहितीवरून सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने बीडमधील इमामपूर रोडवरील गोदामात व जालना रोडवरील एका गोदामात रात्री आठ ते नऊ दरम्यान धाडी टाकल्या. यावेळी १२ लाख किमतीचा टेम्पो (एम. एच. २६ बी. ई.- १९२६) व २० लाख रुपयांचा गुटखा, जाधव प्रकरणात एक लाख ९७ हजार रुपयांचा गुटखा असा सुमारे ३४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एकिकडे गुटखा प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव आल्याने खळबळ उडालेली असतानाच दुसरीकडे गुटखा माफिया महारुद्रमुळे याच्यावर अडीच महिन्यांत गुटखा प्रकरणातील हा तिसरा गुन्हा आहे. यापूर्वी पिंपळनेर ठाणे हद्दीतील पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ६२ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता. यात महारुद्र मुळे मुख्य आरोपी आहे.

तर केजचे सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांनी मांजरसुंबा येथे १३ ऑक्टोबरला गुटख्याची वाहतूक करणारे दोन ट्रक पकडून सुमारे ५७ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला हाेता. त्यातही फरार राहूनही महारुद्र मुळेच गुटख्याचे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले होते. पोलिसांना अद्यापही त्याचा ठाव ठिकाणा का, लागत नाही? असा प्रश्न आहे. त्याच्यावर एमपीडीए सारखी कारवाई का केली जात नाही? मुळेला पाठबळ कोणाचे आणि पोलिसांची त्याच्यावर येवढी मेहरबानी का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

राजकीय हेतूने नाव गोवण्याचा प्रयत्न

सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी बीड व नांदुरघाट येथे कारवायांत गुटखा पकडला. राजकिय हेतुने त्या प्रकरणात माझे नाव गोवण्याचा प्रयत्न होत असून बदनाम करण्याच्या हेतुने हा प्रकार करण्यात आल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Beed Shivsena District Chief Khande
काॅंग्रेसमधून आऊटगोईंग सुरूच; जालन्यातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल

आपला याच्याशी काहीही संबंध नसून वास्तव लवकरच सर्वांसमोर येईल असेही ते म्हणाले. इमामपुर येथील कारवाई दरम्यान पोलिसांकडून आरोपींसोबत महिलांनाही त्रास दिला जात असल्याने आपण हस्तक्षेप केला. यावरुन मलाच आरोपी करण्याचा प्रयत्न पोलीसांकडून होत आहे, असा आरोप खांडे यांनी केला.पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला आहे. अन्याय होत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com