दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार ; चौकशी करा..

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्यापूर्वी ५१३ कोटी २४ लाख रुपयांच्या निविदा प्रक्रियेसाठी अत्यंत घाई-गडबडीने व कमी वेळात निविदा प्रक्रिया का पार पाडण्यात आली? (Opposition Leader Danve)
Opposition Leader Ambadas Danve Letter to Cm Eknath shinde News
Opposition Leader Ambadas Danve Letter to Cm Eknath shinde NewsSarkarnama

मुंबई : सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्याच्या गोंडस नावाखाली सरकारने जाहीर केलेल्या दिवाळी पॅकेजमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे. मंत्रीमंडळ निर्णयापूर्वीच निविदा काढण्यात आल्याने हा घोटाळा उघडकीस आला असून या दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

या पॅकेजसाठी एक रुपयाही न घेता हे पॅकेज मोफत द्यावे आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे, अशी मागणीही दानवे यांनी केली. (Shivsena) ४ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील गोरगरीब जनतेला रेशन दुकानांच्या माध्यमातून दिवाळी फूड किट देण्याचा निर्णय घेण्यात आला. (Maharashtra)

मात्र हा निर्णय होण्यापूर्वीच अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात दिवाळीनिमित्त फूड किट (चना डाळ, रवा, साखर व पामतेल) पुरवठा करणे या योजनेसाठी NCDEX Emarkets limited च्या वतीने दिनांक १ ऑक्टोबर २०२२ ला परिपत्रक प्रसिध्द करण्यात आले.

३ ऑक्टोबर २०२२ पासून निविदा भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आल्याचे समोर आले आहे. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्यापूर्वी ५१३ कोटी २४ लाख रुपयांच्या निविदा प्रक्रियेसाठी अत्यंत घाई-गडबडीने व कमी वेळात निविदा प्रक्रिया का पार पाडण्यात आली?

Opposition Leader Ambadas Danve Letter to Cm Eknath shinde News
Aurangabad : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील चक्क शिवसेना कार्यालयात...

कुणाच्या फायद्यासाठी हे केले जात आहे? असे प्रश्न ही दानवे यांनी पत्रात उपस्थित केले आहेत. एकप्रकारे एखाद्या एजन्सीच्या फायद्यासाठी खुली स्पर्धा न घेता अवघ्या ३ दिवसांत मंत्रिमंडळ निर्णय होण्यापूर्वी ही निविदा काढण्यात आली असल्याचा आरोप देखील दानवे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com