दादांचा खेळ मोठ्या साहेबांनीच संपवला; अजित पवारांसमोरच सत्तारांची टोलेबाजी

(Shivsena Minister Abdul Sattar) आपली गाडी म्हणजे हात दाखवा गाडी थांबवा अशी आहे. तेव्हा अजित दादांनी रोहित पवारांसारखे आपल्याकडेही थोडे लक्ष दिले तर बरे होईल, असेही सत्तार म्हणाले.
Abdul Sattar- Ajit Pawar
Abdul Sattar- Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद ः भाजपसोबत आधी थोडाफार खेळ सुरू होता, अजित दादांनी तो सुरू केला होता, पण मोठ्या साहेबांनी तो इतक्या कमी वेळात संपवला की कुणाला कळलेच नाही? असा टोला राज्याचे ग्रामविकास व महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीतच लगावला.

मी साधा कार्यकर्ता आहे, मी पुन्हा येईल पण अजित पवार स्टेजवर नसतांना येईल, तेव्हा खरा कलगितुला रंगेल. मोठा नेता असला की आमची बोलण्याची अडचण होते, असा चिमटा देखील सत्तार यांनी काढला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या जामखेड मतदारसंघातील एका कार्यक्रमात अजित पवार आणि अब्दुल सत्तार एकाच स्टेजवर आले होते.

सत्तार हे आपल्या फटकाळ आणि बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. पण पवार काका पुतण्यांच्या उपस्थितीच सत्तारांनी पहाटेच्या शपथविधीचा उल्लेख करत अजित पवारांचीच अडचण वाढवली. सत्तारांनी भाजपसोबत दादांनी खेळ सुरू केला होता, पण मोठ्या साहेबांनी दादांचा खेळ लवकर संपवला, असे विधान सत्तार यांनी केले, तेव्हा दादांनी स्टेजवरूनच सत्तार यांना इशारा केला, तेव्हा सत्तार यांनी देखील भाषण आवरते घेतले.

मी एक साधा, भिकारचोट माणूस आहे. माझ्या खानदानीत कधी कुणी साधा ग्रामपंचायत सदस्य देखील नव्हता. मी माझेच साम्राज्य उभे केले, अदाब, सलाम, रामराम, जयभीम करत सगळं जमवंल. आपली गाडी म्हणजे हात दाखवा गाडी थांबवा अशी आहे. तेव्हा अजित दादांनी रोहित पवारांसारखे आपल्याकडेही थोडे लक्ष दिले तर बरे होईल, असेही सत्तार म्हणाले.

एक सुशिक्षित आमदार विधानसभेत निवडून जावा, म्हणून अजित दादांनीच भाजपवाल्यांना ही संधी दिली आणि तुमच्या मताने आणि आशिर्वादाने रोहित पवार आमदार झाले. प्रा.राम शिंदे प्रोफेसरच राहिले. पुर्वी भाजपसोबत खेळ चालायचा, असे म्हणत त्यांनी दादांचा खेळ मोठ्या साहेबांनीच संपवला असे, विधान केले. पण अजित पवारांनी त्यावर स्टेजवरूनच नापंसती व्यक्त करताच, सत्तारांनी भाषण आटोपते घेतले.

Abdul Sattar- Ajit Pawar
कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना सोडणार नाही; पोलिस महासंचालकांचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com