कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना सोडणार नाही; पोलिस महासंचालकांचा इशारा

(Maharashtara Dgp Sanjay Pandy Appeal to people)राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. अशावेळी कुठल्यातरी घटनेचे निमित्त करून ते बिघडण्याचा प्रयत्न करू नये.
Dgp Maharashtra Sanjay Pandy
Dgp Maharashtra Sanjay PandySarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद ः त्रिपुरा राज्यातील कथित मशीद प्रकरणावरून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हिंसक घटना घडल्या आहेत. ज्या घटनेचा राज्याशी संबंध नाही, त्यावरून कायदा व सुव्यवस्था बिघडवणे, रस्त्यावर येऊन तोडफोड, जोळपोळ करणे चुकीचे आहे. पोलीस या परिस्थितीशी दोन हात करण्यास सक्षम आहे, कितीही अतिरिक्त फोर्सची गरज पडली तर ती वापरू, पण राज्यातील शांतता भंग होऊ देणार नाही, आमच्यावर बळाचा वापर करण्याची वेळ आणू नका, शांतता राखा, असे आवाहन व इशारा राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी समाजकंटकांना दिला आहे.

त्रिपुरा राज्यातील एका घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी काही मुस्लिम संघटनांनी राज्यात बंद पाळला. या दरम्यान, नांदेड, मालेगाव, अमरावती शहरात हिंसक घटना घडल्या. लोकांची वाहने, दुकाने फोडून जाळपोळ करण्यात आली. पोलिसांवर हल्ले करण्यात आले, यात अनेक अधिकारी, कर्मचारी जखमी झाले.

या दंगेखोरांना रोखत नाही, तोच दुसऱ्या दिवशी राजकीय पक्षांनी बंद पुकारत हिंसाचार घडवला. विशेषतः अमरावतीत प्रचंड तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. सध्या या शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या इतर भागात उमटू नये, यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत आहे.

राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी या निमित्ताने राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ संदेश जारी केला आहे. कुठल्या तरी, राज्याबाहेरील ज्या घटनेचा आपल्याशी संबंध नाही, अशा गोष्टीसाठी राज्यात हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक करणे कदापी खपवून घेतले जाणार नाही.

राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. अशावेळी कुठल्यातरी घटनेचे निमित्त करून ते बिघडण्याचा प्रयत्न करू नये. विशेषतः तरूणांना माझे आव्हान आहे, जो कोणी हिंसा करतांना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, गुन्हे दाखल करू याचा परिणाम तुमच्या भविष्यावर होणार आहे, याचा प्रत्येकाने विचार करावा.

Dgp Maharashtra Sanjay Pandy
खेळा, अभ्यास करा आणि देशाचे उज्वल भविष्य घडवा; दानवेंकडून बालदिनाच्या शुभेच्छा

कुठल्याही परिस्थितीला तोंड द्यायला महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत, पण आमच्यावर बळाचा वापर करण्याची वेळ आणू नका. ज्या भागात संचारबंदी लागू आहे, त्या भागात नागरिकांनी तिचे पालन करून शांतता कायम राखण्यात पोलिसांना सहकार्य करावे,असे आवाहन देखील पोलिस महासंचालकांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com