Raosaheb Danve News : रावसाहेब दानवे रेल्वेच्या ड्रायव्हर सीटवर; `वंदे भारत` मराठवाड्यात कधी धावणार ?

Mumbai Shirdi Vande Bharat News : रेल्वे खात्याचे राज्यमंत्री पद मिळवणारे ते पहिले मराठवाड्यातील नेते ठरले आहेत.
Raosaheb Danve News : रावसाहेब दानवे रेल्वेच्या ड्रायव्हर सीटवर; `वंदे भारत` मराठवाड्यात कधी धावणार ?

Maharashtra News : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेनने प्रवास केला. (Railway News) रेल्वे मंत्रालयाने देशात वंदे भारत ट्रेनचे जाळे निर्माण करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून या ट्रेनमधून पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा दानवे घेत असतात. आज तर चक्क त्यांनी ट्रेन चालकाच्या शेजारच्या सीटवर बसून काहीवेळ प्रवास केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raosaheb Danve News : रावसाहेब दानवे रेल्वेच्या ड्रायव्हर सीटवर; `वंदे भारत` मराठवाड्यात कधी धावणार ?
Maratha Reservation News : नोकर भरतीला सत्ताधारी आमदारांचाच विरोध; मुख्यमंत्री शिंदेंची झाली अडचण!

चालकाकडून रेल्वे चालवण्यासंबंधीची माहितीही त्यांनी उत्सुकतेपोटी घेतली. त्यानंतर रेल्वे प्रवाशांशी गप्पा मारत वंदे भारत ट्रेनमधील प्रवासाचा अनुभव जाणून घेतला. (Railway) रेल्वेतील सफाई कर्मचारी, अधिकारी, किचन अशा विविध गोष्टींवर बारकाईने लक्ष देत सूचनाही केल्या. गेली ३५ वर्षे राजकारणात असलेले रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे आपल्या साधेपणा आणि ग्रामीण शैलीसाठी ओळखले जातात.

गावचा सरपंच ते दोन वेळा आमदार आणि सलग पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून जाण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. (Maharashtra) यात ते केंद्रात दोनदा राज्यमंत्री झाले. रेल्वे खात्याचे राज्यमंत्री पद मिळवणारे ते पहिले मराठवाड्यातील नेते ठरले आहेत. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांच्याकडे रेल्वे खात्याचा कारभार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मराठवाडा रेल्वे विकासाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मराठवाड्यातील मागण्या प्रलंबित

विद्युतीकरण, दुहेरीकरण, रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण या प्रश्नांवर मराठवाड्यात बऱ्यापैकी काम सुरू आहे. शिवाय मराठवाड्यातून देशाच्या इतर भागात रेल्वे जाळे विस्तारण्यासाठी अनेक नव्या रेल्वामार्गांनाही मंजुरी मिळवण्यात दानवे यांना यश आले आहे. मराठवाड्याचा भाग दक्षिण रेल्वेतून काढून मध्य रेल्वेला जोडावा, ही मागणी केल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. त्यासाठी मराठवाड्यात आंदोलन, रेल रोकोही झाले. परंतु हा प्रश्न काही सुटत नाही. रावसाहेब दानवे यांनीही या प्रश्नापुढे हात टेकले आहेत.

मराठवाडा रेल्वेचा विभाग मध्य मुंबईला जोडणे कदापि शक्य नसल्याचे त्यांनी अनेकदा स्पष्टही केले. आता देशात धावणारी वंदे भारत ट्रेन मराठवाड्यातून कधी धावणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबईहून शिर्डीदरम्यान रावसाहेब दानवे यांनी वंदे भारत ट्रेनच्या चालकाशेजारी बसून अनुभव घेतला. आता प्रत्यक्षात ही महत्त्वाकांक्षी `वंदे भारत` घेऊन ते मराठवाड्यात कधी येणार? याची वाट जनता पाहत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com