Danve On Diffrent Look News : बंजारा पेहरावात दोन्ही दानवे शोभून दिसले..

Marathwada : बंजारा समाजात होळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. लोक कलेच्या माध्यमातून हा समाज संघटीत आहे.
Raosaheb Danve-Ambadas Danve News
Raosaheb Danve-Ambadas Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : राजकीय नेत्यांचा नेहमीच पेहराव आणि कार्यकर्ते किंवा एखाद्या विशिष्ट समाजाच्या कार्यक्रमात त्यांच्या आग्रहावरून केलेला पेहराव नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नुकतेच बंजारा समाजाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले.

Raosaheb Danve-Ambadas Danve News
Dhnanjay Munde On Hail News : पुन्हा अवकाळी अन् गारपीट, मायबाप सरकार मदत घोषित करा..

बंजारा होळी गीत आणि नृत्य स्पर्धेचा हा कार्यक्रम असल्याने तिथे मोठ्या संख्येने आपल्या पारंपारिक पेहरावात स्पर्धक व नागरिक सहभागी झाले होते. (Bjp) विजेत्यांना पारितोषक वितरण करण्यापुर्वी आयोजक आणि उपस्थितांनी दोन्ही दानवेंना बंजारा पेहराव करण्याची विनंती केली. (Marathwada)

दोघांनीही ती मान्य केली आणि मग त्यांना खास बंजारा पद्धतीचा गळ्यात पट्टा, डोक्यावर टोपी घालण्यात आली. ` जैसी बोली, वैसा भेस`, असं आपल्या भाषणातून नेहमी सांगणाऱ्या रावसाहेब दानवे यांनी ते प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून दिले.

यावेळी ते म्हणाले, कचनेर तांडा येथे राष्ट्रीय बंजारा क्रांती सेना व स्थानिक नागरिकांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बंजारा होळी गीत स्पर्धा व नृत्य स्पर्धा (लेंगी) या कार्यक्रमास उपस्थित राहून या लोककलेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. बंजारा समाजात होळीच्या सणाला विशेष महत्त्व आहे.

लोक कलेच्या माध्यमातून हा समाज संघटीत आहे. दरम्यान, या कार्यक्रमाच्या निमित्ताने रावसाहेब दानवे यांनी चितेपिंपळगाव येथे आपले जुने सहकारी माजी आमदार रामभाऊ आप्पा गावंडे यांची सदिच्छा भेट घेतली. विधानसभेत आम्ही सोबत अनेक आधिवेशन गाजवली असे सांगतांना त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com