Danve-Sattar News : जालना-जळगाव रेल्वे रुळावर, दानवे-सत्तार जोडीने करून दाखवले..

Maharashtra : जालना येथून पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्गे गोळेगाव,अजिंठा, फर्दापुर, जळगाव असा हा मार्ग राहणार.
Minister Raosaheb Danve-Abdul Sattar News Jalna
Minister Raosaheb Danve-Abdul Sattar News JalnaSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : राज्य मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत जळगाव ते जालना रेल्वे मार्गासाठी तब्बल ३५५२ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. (Danve-Sattar News) या नव्याने बनणाऱ्या ब्रॉड गेज रेल्वे मार्गासाठी ७१०५.४३ कोटी पैकी राज्याचा हिस्सा ३५५२ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे .बहुचर्चित तसेच अनेक वर्षांपासून सिल्लोड-सोयगावकरांनी पाहिलेले स्वप्न या निर्णयामुळे पुर्ण होणार आहे.

Minister Raosaheb Danve-Abdul Sattar News Jalna
Ambadas Danve On Kendrekar : केंद्रेकरांना स्वेच्छा निवृत्ती घ्यायला भाग पाडले, दानवेंचा आरोप..

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) व खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाल्याचे बोलले जाते. सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यात या रेल्वे मार्गाचे आश्वासन दिले होते. सिल्लोड - सोयगाव येथून रेल्वे मार्ग सुरू व्हावा यासाठी अब्दुल सत्तार यांनी तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासह अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस तसेच अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मागणी केली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून मंत्री सत्तार यांनी ही मागणी लावून धरली होती. (Marathwada) अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. जालना-जळगाव या १७४ किलोमीटरच्या प्रस्तावित रेल्वेमार्गाला जालना येथून सुरुवात होणार असून जालना- जळगाव रेल्वेमार्गामुळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील औद्योगिक विकासासह, शेती, व्यापार, दळणवळण, व्होकल फॉर लोकल, लघुउद्योग, पर्यटनाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

जालना येथून पिंपळगाव, पांगरी, राजूर, भोकरदन, सिल्लोड मार्गे गोळेगाव,अजिंठा, फर्दापुर, जळगाव असा हा मार्ग राहणार असल्याची माहिती सत्तार यांनी दिली. अजिंठा हे ऐतिहासिक शिल्पकलेचे पर्यटन स्थळ या रेल्वे मार्गामुळे येथे जगभरातील पर्यटकांसाठी रेल्वे प्रवासाची सोय देखील होणार आहे.

मराठवाड्याचे आराध्य दैवत राजूर महागणपती येथून हा रेल्वे मार्ग जात असल्याने या भागातील भाविकांसाठी सोयीचे ठरणार आहे. हा रेल्वे मार्ग झाल्याने ग्रामीण भागाचा विकास होणार असल्याचा दावाही सत्तार यांनी केला. दरम्यान, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पाहता रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यासाठी हा निर्णय राजकीय लाभ मिळवून देणारा ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com