Grampanchayat Result : दानवे म्हणतात, जिल्ह्यात उद्धवसेनेचाच भगवा ; शिंदे गटाचाही नंबर वनचा दावा..

Ambadas Danve : जिल्ह्यात एकूण ७६ ठिकाणी विजयाचा झेंडा रोवत शिवसेनेचा भगवा फडकवला.
Aurangabad District Grampanchayat Result News
Aurangabad District Grampanchayat Result NewsSarkarnama
Published on
Updated on

Aurangabad News : जिल्ह्यातील २१६ पैकी निवडणुक झालेल्या २०२ ग्रामपंचायतींचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांकडून आम्हीच नंबर वन असल्याचा दावा केला जातोय. Grampanchayat Result विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जिल्ह्यात ठाकरे गटाला सर्वाधिक ७६ ग्रामपंचायतींवर विजय मिळाल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने हा दावा फेटाळून लावत आम्हीच क्रमांक एकवर असल्याचे म्हटले आहे.

Aurangabad District Grampanchayat Result News
Gram Panchayat Result : मंत्री भुमरेंना दणका, बिडकीन, आडुळमध्ये उद्धवसेनेचा सरपंच..

या दाव्या-प्रतिदाव्यांमुळे राजकीय पक्ष आणि त्यांचे समर्थक देखील चक्रावून गेले आहेत. अंबादास दानवे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ७३ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला आहे. (Shivsena) दानवे यांच्या दाव्यानूसार मतमोजणीनंतर हाती आलेल्या निकालानुसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्ह्यात एकूण ७६ ठिकाणी विजयाचा झेंडा रोवत शिवसेनेचा भगवा फडकवला. (Aurangabad)

जिल्ह्यातील सुजाण नागरिकांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विश्वास ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात जास्त उमेदवार निवडून आणले आहेत. हाती आलेल्या निकालानुसार शिवसेना ७६, राष्ट्रवादी २८ काँग्रेस १८, शिंदे गट २६ भाजपा ४१, महाविकास आघाडी १७ व अन्य १० जागांसह एकूण २१६ ग्रामपंचायतिचे संख्याबळ निश्चित झाले असून पैठण तालुक्यातील आडूळ, बिडकीन या ग्रामपंचायती अत्यंत प्रतिष्ठेच्या व जिव्हाळ्याच्या ग्रामपंचायती मानल्या जातात.

मात्र शिवसेनेच्या मजबूत संघटना बांधणीमुळे या दोन्ही जागेवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. त्याचबरोबर पैठणसह, वैजापूर गंगापूर, रत्नपूर आदी ग्रामपंचायतीत देखील शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. ग्रामपंचायतीचा निकाल हाती लागताच सर्वत्र फटाके फोडून तसेच गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

ग्रामपंचायत निवडणुक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आमदार उदयसिंह राजपूत, सहसंपर्कप्रमुख आसाराम रोठे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे, अविनाश पाटील, कृष्णा डोणगावकर, अविनाश गलांडे, संजय निकम, अवचित वळवळे.

बप्पा दळवी, सुदर्शन अग्रवाल, अंकुश रंधे, अशोक शिंदे तालुकाप्रमुख सचिन वाणी, दिनेश मुथा, सुभाष कानडे, राजू वरकड, संजय मोटे, मनोज पेरे, सोमीनाथ कापरे,अनंत भालेकर, शंकर ठोंबरे बाळासाहेब गायकवाड यांच्यासह सर्व स्थानिक शिवसेना, युवासेना, महिलाआघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभल्याचेही दानवे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com