Raosaheb Danve News : मोदींच्या जनसंपर्क अभियानात दानवेंची डबा पार्टी रंगली..

Bjp : गेल्या वर्षी रावसाहेब दानवे यांनी जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यातून `युवा मोर्चा, भाकऱ्या घरच्या`, अशी हाक दिली होती.
Raosaheb Danve News, Jalna
Raosaheb Danve News, JalnaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalna : भाजपचे सामान्य कार्यकर्ते आणि नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद वाढावा, गल्ली ते दिल्लीपर्यंतची चर्चा व्हावी. (Raosaheb Danve News) केंद्रातील भाजप सरकारकडून गोरगरिब, सामन्य जनतेसाठी राबवत असलेल्या योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचावी या हेतूने भाजपकडून डबा पार्टीची संकल्पना समोर आली.

Raosaheb Danve News, Jalna
High Court News : जात वैधता प्रमाणपत्रासाठी सरपंच, सदस्यांना अपात्र ठरवले ; जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस..

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी हा प्रयोग आपल्या मतदारसंघात सर्वप्रथम केला होता. (Bjp) आता हा प्रयोग देशपातळीवर भाजपकडून राबवला जातोय. मोदी @9 जनसंपर्क कार्यक्रमा अंतर्गत सध्या देशभरात भाजपकडून डब्बा पार्टी -टीफीन बैठकांचे आयोजन केले जात आहे.

रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितात (Jalna) जालन्यात डबा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दानवे यांनी आमदार नारायण कूचे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सहभोजनाचा आनंद घेतला. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यानी आपआपल्या घरुन डबा आणून सहभोजन केले. यावेळी रावसाहेब दानवे यांनी चांगलीच टोलेबाजी केल्याने डबा पार्टीत रंगत आली होती. ठेचा, भाकरी आणि अस्सल गावराण भाज्यांचा समावेश असलेल्या या डबा पार्टीत सगळ्यांनीच स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

गेल्या वर्षी रावसाहेब दानवे यांनी जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यातून `युवा मोर्चा, भाकऱ्या घरच्या`, अशी हाक देत केवळ युवा मोर्चाच नाही तर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पक्षाच्या मेळाव्यात घरून भाकऱ्या, डबा सोबत घेऊन येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर गोवोगावी डबा पार्ट्यांचे आयोजन सुरू झाले होते. त्यानंतर आता मोदी @9 या महत्वाकांक्षी जनसंपर्क अभियानाचा डबा पार्टी हा एक महत्वाचा भाग बनला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.