Marathwada Political News : मराठा बांधव नाराज आहेत, त्यामुळे दसरा मेळाव्याला लोक कमी आहेत. गेल्यावेळी माझ्या मतदारसंघातून २५ हजार लोक आले होते, यंदा ही संख्या २० हजारच असल्याचे पणन व अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी कबूल केले. (Mumbai Dasara Melava) मुंबईत आज होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून लोकांना नेण्यासाठी दोनशे बस बुक केल्या होत्या.
परंतु मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री, खासदार, आमदारांना गावबंदीची घोषणा केल्यानंतर याचा फटका मुंबईतील दोन्ही शिवसेना पक्षांना बसताना दिसतो आहे. सर्वाधिक फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मेळाव्याला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून वीस हजार लोक गेल्याचा दावा ते करत असले तरी हा आकडा पाच ते सात हजारांपेक्षा जास्त नसल्याचे विरोधक सांगतात.
काल दुपारपासून सिल्लोड येथील सत्तारांच्या संपर्क कार्यालयासमोर सत्तर बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. पण सायंकाळपर्यंत लोक येत नसल्याने जेमतेम अर्ध्या भरलेल्या बसेस मुंबईकडे रवाना करण्यात आल्या. (Maharashtra) बस भरेल इतके लोक येत नसल्याने अखेर सत्तारांनी बुक केलेल्या २०० पैकी ६० बस रद्द करण्यात आल्या. १४० बसमधूनही निम्मेच सीट भरले होते. बस भरत नसल्याने मग खासगी वाहनांमधून १२-१५ लोकांची व्यवस्था करण्यात आली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आज ही सगळी वाहने सकाळी मुंबईत दाखल झाली. या वेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी मराठा समाजाच्या नाराजीचा परिणाम मेळाव्याला येणाऱ्या लोकांच्या संख्येवर झाल्याची स्पष्ट कबुलीच दिली. मराठा बांधव नाराज असल्यामुळे दसरा मेळाव्याच्या गर्दीवर परिणाम झाला आहे. गेल्यावेळी माझ्या मतदारसंघातून २५ हजार लोक एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला मुंबईत आले होते.
या वेळी मराठा समाजाच्या नाराजीमुळे ही संख्या पाच हजारांनी घटली. यंदा २० हजार लोक मेळाव्यासाठी माझ्या मतदारसंघातून घेऊन जात आहे. मराठा समाजाची नाराजी असली तरी एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षभरात सर्वसामान्यांसाठी घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांमुळे लोक त्यांना पसंत करतात. त्यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे, त्यामुळे प्रत्यक्ष आझाद मैदानावर तुम्हाला प्रंचड गर्दी दिसेल, असा दावाही सत्तार यांनी केला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.