देगलूर-बिलोलीचे नवनिर्वाचित आमदार जितेश अंतापूरकर यांनी घेतली सदस्यत्वाची शपथ

(Deglur-Biloli Mla Jitesh Antapurkar) यावेळी जितेश अंतापूरकर यांना आपले वडिल स्व.रावसाहेब अंतापूरकर यांची आठवण झाली. वडिलांना अपेक्षित काम यापुढे मतदारसंघात करणार असल्याचे ते म्हणाले.
Mla Jitesh Antapurkar
Mla Jitesh AntapurkarSarkarnama
Published on
Updated on

नांदेड ः रावसाहेब अंतापूरकर यांच्या आकस्मिक निधन झाल्यामुळे देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणुक झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजप उमेदवाराचा पराभव करत जितेश चाळीस हजाराहून अधिकचे मताधिक्य घेऊन विजयी झाले होते.

अंतापूरकर यांनी आज मुंबईत विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. सभागृहाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. यावेळी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदींची उपस्थिती होती.

देगलूर-बिलोलीची पोटनिवडणूक राज्यभरात गाजली, या निवडणुकीत कोणाची सरशी होते याकडे देखील राज्याचे लक्ष होते. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण विरुद्ध भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर असेच या निवडणुकीला स्वरुप आले होते. प्रचारात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

भाजपने प्रचारात केंद्रीय मंत्र्यांना देखील उतरवले. पण अशोक चव्हाण यांनी या निवडणुकीची सगळी सुत्र एकहाती सांभाळली आणि जितेश अंतापूरकर यांना निवडून आणले. पोटनिवडणुकीती विजयाने महाविकास आघाडी अधिक भक्कम झाल्याचे चव्हाण यांनी म्हटले होते.

जितेश अंतापूरकर यांनी आज मुंबईत विधानसभा सदस्य म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. यावेळी जितेश अंतापूरकर यांना आपले वडिल स्व.रावसाहेब अंतापूरकर यांची आठवण झाली. वडिलांना अपेक्षित काम यापुढे मतदारसंघात करणार असल्याचे ते म्हणाले.

Mla Jitesh Antapurkar
मोहन भागवतांचे देवगिरी प्रातांत आगमन; औरंगाबादेत पाच दिवस मुक्काम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com