देगलूर-बिलोलीकरांनी वंचितसह दहा उमेदवारांचे डिपाॅझीट केले जप्त

(Deglur-Biloli By Election) वंचितचे उमेदवार डाॅ. उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४८ मते मिळाली होती. तर उर्वरित ९ पैकी एकाही उमेदवाराला चार आकडी मतांची संख्या गाठता आली नव्हती.
Mla Jitesh Antapurkar
Mla Jitesh AntapurkarSarkarnama
Published on
Updated on

नांदेड ः देगलूर-बिलोली विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट होणार असे बोलले जात होते. निवडणूक निकालानंतर ते स्पष्ट देखील झाले, परंतु वंचित बहुजन आघाडीकडून चमत्काराचा दावा केला जात होता. मात्र देगलूर-बिलोलीच्या मतदारांनी तो दावा फोल ठरवत वंचितच्या डाॅ.उत्तम इंगोले यांच्यासह दहा उमेदवारांचे डिपाॅझीट जप्त केले.

देगलूर-बिलोलीतील महाविकास आघाडीच्या विजयाची चर्चा अजूनही राज्यभरात सुरू आहे. भाजपने सगळी शक्तीपणाला लावून देखील सार्वजनिक बांधकामंत्री अशोक चव्हाण यांनी गेल्यावेळी काॅंग्रेसकडे असलेली जागा राखली.

जितेश अंतापूरकर यांना निवडून आणत चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यावर असलेले आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. काॅंग्रेससाठी हा विजय किती महत्वाचा होता हे निकालानंतर अशोक चव्हाण यांना आलेल्या सोनिया गांधी यांच्या फोनवरून स्पष्ट होते.

भाजपसोबतच महाविकास आघाडीला वंचितचे देखील दुहेरी आव्हान होते. परंतु लोकसभा निवडणुकीतील अनुभव अन् मला न तुला घाल.. या चव्हाण यांच्या आवाहनामुळे मतांची फाटाफूट यावेळी झाली नाही. परिणामी जितेश अंतापूरकर यांचा विजय सुकर झाला.

या निवडणुकीत १२ उमेदवार रिंगणात होते, पैकी १० जणांचे डिपाॅझीट जप्त झाले आहे. वंचितचे उमेदवार डाॅ. उत्तम इंगोले यांना ११ हजार ३४८ मते मिळाली होती. तर उर्वरित ९ पैकी एकाही उमेदवाराला चार आकडी मतांची संख्या गाठता आली नव्हती.

Mla Jitesh Antapurkar
देवस्थान जमिन घोटाळा : वक्फ बोर्डाने फटाके फोडले; महसूलचा बॉम्ब कधी फुटणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com