AIMIM News : दिल्लीतील प्रचार संपला, आता संभाजीनगर महापालिकेत एमआयएमचा महापौर करण्यासाठी मिशन हाती घेणार!

The election campaign for the Delhi Assembly concludes, and Imtiaz Jalil sets his sights on the upcoming Sambhajinagar Municipal Corporation elections. : लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला असला तरी आम्हाला मिळालेल्या मतांची संख्या कमालीची वाढली आहे.
MP Imtiaz Jaleel  News
MP Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Imtiaz Jaleel : राजधानी दिल्ली मध्ये ओखला आणि मुस्तफाबाद या दोनच मतदार संघात निवडणूक लढवत असलेल्या एमआयएमने सध्या आपले लक्ष यावरच केंद्रीत केले आहे. हैदराबादसह महाराष्ट्रातील पक्षाचे प्रमुख नेते गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत पक्षाच्या प्रचारात व्यस्त आहेत. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील हे देखील प्रचारात असल्याने सध्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या दृष्टीने पक्षाची कुठलीच तयारी दिसत नाही.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपला आहे, त्यामुळे उद्यापासूनच आम्ही तयारीला लागणार आहोत, असे इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीनंतर एमआयएमने पक्षाची कार्यकारणी बरखास्त केली होती. आता नव्याने कार्यकारिणी निवडून महापालिका निवडणुकीची रणनीती लवकरच आखावी लागणार आहे. लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला असला तरी आम्हाला मिळालेल्या मतांची संख्या कमालीची वाढली आहे.

विशेषतः शहरातील पूर्व, मध्य मतदार संघात मला आणि नासेर सिद्दीकी यांना चांगली मते मिळाली आहेत. आमच्यासाठी आगामी महापालिकेच्या दृष्टीने ही महत्वाची बाब असल्याचे इम्तियाज जलील 'सरकारनामा'शी बोलताना म्हणाले. महापालिका निवडणुकीत (AIMIM) एमआयएमचा महापौर करणे हे आमचे उदिष्ट आहे. केवळ मुस्लिम बहुल भागातच नाही तर पूर्व मतदारसंघात आमच्या पक्षाला हिंदू जनतेची मतेही मिळाली होती.

MP Imtiaz Jaleel  News
Imtiaz Jaleel News : माझ्या आयुष्यातील विधानसभेची ही सर्वात भ्रष्ट निवडणूक; इम्तियाज जलील का संतापले?

त्यामुळे आता आम्ही मर्यादित वार्डात नाही तर शहराच्या विविध भागात महापालिका निवडणुकीत उमेदवार देणार आहोत. कोणता पक्ष युतीत-आघाडीत लढतो याचा आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही आधीपासूनच स्वतंत्र महापालिकेची निवडणूक लढवत आलो आहोत. यावेळी आम्ही स्वतंत्रच लढणार आहोत. महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका आतापर्यंत पार पाडली, पण यावेळी आम्ही महापौर आमचा बसवू, असा विश्वास इम्तियाज जलील यांनी व्यक्त केला.

MP Imtiaz Jaleel  News
AIMIM campaigning News : दिल्लीच्या 'गल्लीत'घुमतोय इम्तियाज जलील यांचा आवाज!

महापालिकेत एमआयएमचे 25 नगरसेवक होते, ही संख्या यावेळी कमालीची वाढेल. 25 वर्ष सत्ता भोगणाऱ्या शिवसेना-भाजप युतीला शहरातील नागरिकांना दररोज पाणी देता आलेले नाही. शहरासाठी मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजना रखडली आहे. त्यामुळे कितीही दावे केले जात असले तरी अजून सहा ते आठ महिने शहरवासियांना पाणी मिळू शकणार नाही, अशी परिस्थिती आहे. अशावेळी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या एमआयएमला लोक निश्चित पंसती देतील, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com