Dhananjay Munde On Sanjay Raut : संजय राऊतांकडून अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी,धनंजय मुंडेंचा पाराच चढला; म्हणाले, '' ते काय पवार...''

NCP Political News : '' ...त्यावर अजित पवार आणि शरद पवार एकत्र मिळून निर्णय घेतील!''
Dhananjay Munde - Sanjay Raut- Ajit Pawar
Dhananjay Munde - Sanjay Raut- Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Beed Political News

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची बीडला सभा झाली होती. या सभेत पवारांसह जितेंद्र आव्हाडांनी आमदार संदीप क्षीरसागर यांना ताकद देतानाच कृषिमंत्री आणि अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या सभेनंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडत आहेत. याचवेळी ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावरुनच आता मुंडेंनी राऊतांना फैलावर घेत त्यांना खडे बोल सुनावले आहे.

बीडमध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी संजय राऊतांवर टीका केली. मुंडे म्हणाले, संस्थेतील राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवार आणि शरद पवार एकत्र मिळून निर्णय घेतील, कारण हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, संजय राऊत हे पवार कुटुंबाचे सदस्य झाले आहेत का? असा उलटा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Dhananjay Munde - Sanjay Raut- Ajit Pawar
Rajni Patil News : रजनी पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी; काँग्रेसच्या वर्किंग कमिटीवर नियुक्ती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची येत्या 27 ऑगस्टला जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या तयारीसाठी मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी बीडमध्ये बैठक घेतली. त्यानंतर ते म्हणाले , "27 तारखेची सभा ही यापूर्वीच होणार होती, मात्र, काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे 17 तारखेला झालेल्या शरद पवार यांच्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा नसून बीड जिल्ह्याची अस्मिता, विकास आणि सन्मानाची सभा आहे. 17 तारखेला झालेल्या सभेला 2024 मध्ये जनताच उत्तर देईल असेही ते म्हणाले.

आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. त्यामुळे माझ्यासमोर कुठलंही मोठं आव्हान नसून परळी मतदारसंघात केलेली काम आणि विकास आणि लोकांच्या मनामध्ये मी स्थान मिळवलेलं आहे असेही मंत्री धनंजय मुंडे म्हणाले.

Dhananjay Munde - Sanjay Raut- Ajit Pawar
Adhalrao Patil vs Amol Kolhe: पुणे-नाशिक रेल्वेचा श्रेयवाद पुन्हा पेटला ? शिरुरच्या आजी - माजी खासदारांमध्ये जुंपली

संजय राऊत काय म्हणाले होते..?

संजय राऊत(Sanjay Raut) यांनी दैनिक 'सामना'तील रोखठोकमधून हे भाष्य केलं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटी राजकीय नाहीत. शरद पवार यांनी अनेक संस्था निर्माण केले आहे. या संस्थांचं जाळं पसरलं आहे. अजित पवार यांना अजितदादांनी या संस्थांमध्ये घेतलं आहे.

राज्यातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थांच्या चेअरमनपदी शरद पवार आणि संचालकपदी अजित पवार आहेत. असे अनेक त्रांगडे अनेक संस्थात आहे. या संस्थांचा वेलू गगनावर नेण्याचं काम शरद पवार(Sharad Pawar) यांनी केलं आहे. या वेलूवर जे लटकत आहेत. त्यांनी त्यांची पदे सोडून स्वत:च्या संस्था निर्माण करण्याचं औदार्य दाखवलं पाहिजे असा घणाघात राऊतांनी केला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com