Rajni Patil News : रजनी पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी; काँग्रेसच्या वर्किंग कमिटीवर नियुक्ती

Congress News : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या नव्याने नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
Rajni Patil, Sonia Gandhi News
Rajni Patil, Sonia Gandhi NewsSarkarnama
Published on
Updated on

Congress Working Committee : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या नव्याने नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या वर्किंग कमिटीवर राज्यातील निवडक नेत्यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेनुगोपाल यांनी रविवार (ता.२०) जाहीर केलेल्या यादीत बीड जिल्ह्यातील राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील यांना संधी देण्यात आली आहे.

खासदार रजनी पाटील यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांतून आनंदोत्सव साजरा केला जात आहे. शहरातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या पाटील या गांधी कुटुंबाच्या अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. एकूणच पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या निकटवर्तीय नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे.

Rajni Patil, Sonia Gandhi News
Yashomati Thakur Appointed On CWC : विदर्भातील आणखी एका नेत्यावर काँग्रेसकडून महत्वपूर्ण जबाबदारी; टीम 'राहुल'मधील यशोमती ठाकुरांचे प्रमोशन

त्यांची हिमाचल प्रदेशच्या प्रभारी म्हणून यशस्वी राहिलेली कारकीर्द विचारात घेऊन त्यांच्यावर सध्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा अनुभव विचारात घेऊन त्यांना रविवारी जाहीर करण्यात आलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीत स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रीय व राज्याच्या काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करून आनंद साजरा केला जात आहे.

Rajni Patil, Sonia Gandhi News
Congress Working Committee: काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची घोषणा; महाराष्ट्रातील 'या' नेत्यांना महत्वाचे स्थान

या कमीटीमध्ये ३९ सदस्य, ३२ स्थायी निमंत्रित आणि नऊ विशेष निमंत्रितांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी (Rahul Gandhi), अधीर रंजन चौधरी, एके अँटोनी, अंबिका सोनी, मीरा कुमार, दिग्विजय सिंह, पी. चिदम्बरम, तारिक अन्वर, पु. लालथनहवला, मुकुल वासनिक, आनंद शर्मा, अशोक चव्हाण, अजय माकन, चरणजीत सिंह चन्नी, प्रियांका गांधी वाड्रा, कुमारी शैलजा, गईखंगम गंगमई, एन. रघुवीरा रेड्डी, शशी थरूर, ताम्रध्वज साहू, अभिषेक मनु सिंघवी, सलमान खुर्शीद, जयराम रमेश, जितेंद्र सिंह, रणदीप सिंह सुरजेवाला, सचिन पायलट, दीपक बाबरिया, जगदीश ठाकोर, जीए मीर, अविनाश पांडे, दीपा दास मुन्शी, महेंद्रजीत सिंह मालविय, गौरव गोगोई, सय्यद नसीर हुसैन, कमलेश्वर पटेल, के. सी. वेणुगोपाल यांची नावे आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com