Marathwada Political News : लातूरचे माजी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत झालेला काॅंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळावा आणि धोंडे जेवणाच्या कार्यक्रमाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. (Latur Political) या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी जोरदार टोलेबाजी करत विरोधक आणि पक्षांतर्गत इच्छूकांनाही चिमटे काढले.
महाविकास आघाडीची सत्ता आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद असतांना अमित देशमुख (Amit Deshmukh) यांचा रुबाब होता. अडीच वर्ष पालकमंत्री आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. (Latur) पण शिवसेनेत फूट पडली आणि सत्ता, मंत्रीपद गेले. आता विरोधकाच्या भूमिकेत असलेल्या अमित देशमुख यांनी याला वेळ, काळ आणि नशिबाला दोष दिला आहे.
राजकारणात योग्य वेळ म्हणजेच काळ, कपाळ म्हणजे नशिब जोरावर असले तर सगळं काही मिळतं. पण सध्या या दोघांचीही साथ नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. (Marathwada) पण त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये मात्र चांगलाच हशा पिकला होता. महाराष्ट्रामध्ये सध्या पक्षाचे नव्हे तर गटागटाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे लोकांचे कल्याण करण्यापेक्षा त्यांची पिळवणूक सध्याच्या सरकारकडून सुरू असल्याची टीकादेखील अमित देशमुख यांनी केली.
कासार शिरसी अप्पर तहसिल व तालुका निर्मितीवरून राजकारण पेटलेले असतांना देशमुख यांनी देखील या वादात उडी घेत वस्तुस्थिती सांगितली. सध्या जिल्ह्यामध्ये उठसूठ तालुका निर्माण करतो म्हणून राजकारण केले जाते. पण तालुका निर्मितीची प्रक्रिया लोकप्रतिधींच्या हातात नसते. कोणीही तालुका करतो म्हणत असेल ते हे बालीसपणाचे आहे. ही मंत्रीमंडळाच्या हातातील बाब आहे, याला कॅबिनेटची मंजूरी लागते, असे स्पष्ट केले.
त्यामुळे कासार सिरसी तालुका निर्मितीच्या वादात अमित देशमुख निलंगेकरांच्या बाजूने असल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. निलंगा येथील काँग्रेस मेळावा व धोंडेजेवण कार्यक्रमात ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अविनाश रेशमे यांनी हजेरी लावली. हजरजबाबी देशमुख यांनी हे हेरत त्यांनाही टोला लगवाला. हा काँग्रेस पक्षाचा मेळावा आहे, आमचेच सरेनासे झाले आहे तुम्ही कशाला हजेरी लावली? हा मेळावा काँग्रेस पक्षाचा होता, महाविकास आघाडीचा नव्हता हे सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला, तर रेशमे यांनी डोक्याला हात मारून घेतला.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.