Marathwada Politics : धनंजय मुंडेंच्या धडाक्याने भाजप गार ! पालकमंत्रीपद नकोरे बाबा

Dhananjay Munde News : सत्तेत असूनही बीड भाजपला तक्रारींचेच पाढे वाचावे लागतात
Dhananjay Munde News
Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed News : तीन वर्षे सत्तेपासून दुर राहीलेली भाजप गेल्या वर्षी सत्तेत आली. मात्र, पालकमंत्रीपद छत्रपती संभाजीनगरच्या अतुल सावेंना मिळाले. आता सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) मंत्रिपद मिळाले असून पालकमंत्रीपदही त्यांनाच निश्चित मानले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप तेव्हाही दुय्यम आणि आताही दुय्यम असल्याने तक्रारींचे पाढेच वाचण्याची वेळ पक्षावर आली आहे.

जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादी ताकदीचे पक्ष आहेत. मात्र, भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचाच विधानसभेत पराभव झाल्यानंतर पक्षातील पहिल्या फळीने थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संधान बांधले. मात्र, दुसरी फळी सैरभैरच आहे. दरम्यान, दिड वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झाले खरे पण जिल्ह्यातील भाजप आमदारांऐवजी छत्रपती संभाजी नगरच्या अतुल सावे यांना मिळाले. जिल्ह्यात भाजपचे लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा हे विधानसभेचे तर सुरेश धस विधान परिषदेचे आमदार आहेत.

Dhananjay Munde News
Wablewadi School Case : वाबळेवाडी शाळा प्रकरणातील दत्तात्रय वारे अखेर दोषमुक्त : पुणे जिल्हा परिषदेकडून आदेश जारी

दरम्यान, अतुल सावे यांच्या बद्दलच्या तक्रारींचे पाढे वाचण्यात भाजपचे वर्ष गेले. जिल्हा नियोजन समिती निधी वाटपात अतुल सावेंनी भाजप आमदार व इतर नेत्यांच्या शिफारशींना थेट केराची टोपली दाखविली. याबद्दल जिल्ह्यातील नेत्यांनी देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे उंबरठे झिजवूनही काही फरक पडला नाही. आता तर धनंजय मुंडे यांना अगोदर कृषीमंत्रीपद मिळाले असून त्यांना पालकमंत्रीपद भेटणार हे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर करुन टाकले. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यातील भाजप नेत्यांची तक्रारींच्या पाढ्यांना सुरुवात झाली.

पहिल्याच फटक्यात मुंडेंनी जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणेवर पकड निर्माण केली आहे. सध्या सावे पदापुरते पालकमंत्री असले तरी सर्व कारभार मुंडे म्हणतील तसाच सुरू आहे. आता त्यांना पालकमंत्रीपद भेटले तर काय, असा मोठा प्रश्न भाजपला पडला आहे. त्यामुळे यापूर्वी सावेंनी ऐकले नसले तरी पद त्यांच्याकडेच ठेवा, असा अर्जव भाजपजणांकडून फडणवीसांकडे करण्यात येत आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Dhananjay Munde News
Beed Politics : धनूभाऊंच्या परळीतील 'शासन आपल्या दारी'ला भाजपचा खोडा ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com