Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : पाटील... पाटील... दादा.. दादा...; जरांगेंना शांत करता-करता आंदोलकांची दमछाक

Maratha Reservation Protest In Antarvali Sarati : देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना मनोज जरांगे पाटील आक्रमक झाल्याने अंतरवाली सराटीत गोंधळ
Manoj Jarange
Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समजाला आरक्षण द्यायचेच नाही. माझ्यावर नसते आरोप करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला संपवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. त्यांना माझा बळी हवा आहे, असे गंभीर आरोप करत आक्रमक झालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांनी खुले आव्हान दिले. फडणवीसांनी माझा बळी खुशाल घ्यावा, मीच सागर बंगल्यावर येतो, असा इशारा देत जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. (Manoj Jarange Vs Devendra Fadnavis)

दरम्यान, संयम सुटल्याने त्यांच्या भावनांचा मोठा उद्रेक झाला. हे ओळखून तेथे उपस्थित समाजबांधवांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पाटील.. पाटील शांत राहा. दादा.. दादा स्वतःला सांभाळा. पाटील आम्हाला तुम्ही हवे आहेत, आरक्षण नंतर. आपण जाऊ पण आधी उपोषणामुळे तब्येतीची काळजी घेऊ, अशी आर्जव करण्यात आली. मात्र जरांगे पाटील कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी तडक व्यासपीठ सोडले आणि मुंबईतील फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) शासकीय निवास्थान सागर बंगल्याकडे निघाले. दरम्यान, समाजाच्या वतीने त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Manoj Jarange
Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : मनोज जरांगेंच्या भावनांचा उद्रेक; फडणवीसांना दिला मोठा इशारा...

मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) फडणवीसांवर आंदोलनात फूट पाडण्यासाठी सर्व प्रयत्न केलेत. त्यासाठी त्यांनी आपल्यातीलच बारस्कर यांना पुढे केले. त्यांना मराठ्यांना मोठे होऊ द्यायचे नाही. असे म्हणत फडणवीसांनी कुणाकुणाला कसे संपवले, याची यादीही सांगितली. त्यांना माझा बळी हवा असेल तर घ्यावा. मी सागर बंगल्यावर येतो, त्यांनी माझ्यावर गोळ्या झाडाव्यात. मात्र मी मराठ्यांना (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेणारच असा निर्धारही जारांगेंनी व्यक्त केला.

यानंतर जरांगे पाटील व्यासपीठावरून उठले आणि मुंबईला (Mumbai) निघाले. त्यावेळी त्यांची सामजाच्या वतीने मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पाटील.. पाटील शांत राहा. दादा.. दादा आम्हाला तुम्ही हवे आहात.. तु्म्ही सध्या शांत राहा, पाटील आम्हाला तुम्ही हवेत, आरक्षण नंतर अशी विनंती जरांगे पाटलांच्या जवळच्या लोकांनी केली. मात्र ते कुणाचेही ऐकण्याच्या तयारीत नव्हते. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेन चालत चालत निघाले. समर्थकांनी त्यावेळी वाहने तयार केली. त्या वाहनांतून ते अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Manoj Jarange
Nitesh Rane Vs Jarange : "...तर सागर बंगल्याची भिंत ओलांडणं अवघड जाईल", राणेंचा जरांगे-पाटलांना थेट इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com