Nitesh Rane Vs Jarange : "...तर सागर बंगल्याची भिंत ओलांडणं अवघड जाईल", राणेंचा जरांगे-पाटलांना थेट इशारा

Manoj Jarange Patil Vs Devendra Fadnvis : मनोज जरांगे-पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत.
nitesh rane devendra fadnavis manoj jarange patil
nitesh rane devendra fadnavis manoj jarange patilsarkarnama

मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील ( Manoj Jarange Patil ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "मला संपवण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी रचलं आहे. त्यातून वेगवेगळी लोक पुढे करून माझ्यावर वैयक्तिक आरोप केले जात आहेत. फडणवीसांना माझा बळीच हवा असेल, तर मी आज सागर बंगल्यावर येतो, त्यांनी मला ठार करावं. मी सागर बंगल्यावर जाऊन उपोषण करणार," अशी घोषणा जरांगे-पाटलांनी केली. यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी जरांगे-पाटलांना इशारा दिला आहे. ( Nitesh Rane Warn Manoj Jarange Patil )

nitesh rane devendra fadnavis manoj jarange patil
Manoj Jarange Vs Devendra Fadnavis : मनोज जरांगेंच्या भावनांचा उद्रेक; फडणवीसांना दिला मोठा इशारा...

"जरांगे-पाटलांनी राजकारण केलं आणि आमच्या नेतृत्वाला धमक्या दिल्या, तर सागर बंगल्याची भिंत ओलांडण अवघड जाईल," असं नितेश राणेंनी म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिशीनी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नितेश राणे म्हणाले, "जरांगे-पाटलांचा लढा आरक्षणासाठी आहे की फडणवीसांना लक्ष्य करण्यासाठी आहे. जरांगे-पाटील वाचून दाखवत असलेली स्क्रिप्ट कुणी लिहिली आहे. कारण, या स्क्रिप्टवरून मला तुतारीचा वास येत आहे. हा लढा मराठा समाजासाठी असेल, तर समाजापुरताच मर्यादित ठेवावा. जरांगे-पाटलांनी राजकारण केलं, आमच्या नेतृत्वाला धमक्या दिल्या, तर सागर बंगल्याची भिंत ओलांडण अवघड जाईल."

nitesh rane devendra fadnavis manoj jarange patil
Manoj Jarange Patil : जरांगेंचा बोलविता धनी सिल्वर ओक की जालन्यातील भैया फॅमिली? भाजप आमदार प्रसाद लाडांचा सवाल

"आमच्या सरकारनं 10 टक्के आरक्षण दिलं असून, मराठा समाजानं ते स्वीकारलं आहे. जरांगे-पाटलांचं समाधान होत नसल्यानं ते फडणवीसांवर टीका करत आहेत. तर आम्ही मराठेही येथे उभे आहोत," असं नितेश राणेंनी सांगितलं.

nitesh rane devendra fadnavis manoj jarange patil
Manoj Jarange Patil : 'तुम्हाला मराठा मोडू शकतो'; जरांगेंचा फडणवीसांना इशारा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com