Devendra Fadnavis : स्वप्न बाळासाहेबांचे, पूर्ण केले अमित शाहांनी; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं

Amit Shah Rally News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतांना अडीच वर्षे संभाजीनगरच्या नामकरणाची फाईल धूळखात पडून होती.
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra FadnavisSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरात राजकीय सभा होत असेल आणि त्यात शहाराच्या नामकरणाचा विषय आला नाही तर नवलच. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील पहिल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करण्याचे श्रेय भाजपचेच असल्याचे ठणकावून सांगितले.

ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरून बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला संभाजीनगर नाव देण्याची घोषणा केली. ते प्रत्यक्षात उतरवण्याचे स्वप्न पाहिले, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पूर्ण केले, असा उल्लेख करत फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Deepak Kesarkar News : रश्मी ठाकरे अन् आदित्य ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटले; केसरकरांचा खळबळजनक दावा

मराठवाड्याच्या राजकारणात संभाजीनगरच्या नामकरणाचा मुद्दा गेल्या 30-35 वर्षापासून वापरला गेला. शिवसेना-भाजप युतीचे सरकार एकदा नव्हे तर दोनदा राज्यात आले, तरीही हा प्रश्न संपूर्णपणे निकाली काढण्यात यश आले नव्हते. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असतांना अडीच वर्षे संभाजीनगरच्या नामकरणाची फाईल धूळखात पडून होती. सरकार जाताजाता ठराव घेतला गेला, याची आठवण करुन देत फडणवीस यांनी ठाकरेंवर हल्ला चढवला.

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे अचानकच पवारांच्या भेटीला; आघाडीतील 'त्या' जागांचा तिढा सुटणार?

एवढेच नाही तर आमचे सरकार आल्यानंतर आम्ही छत्रपती संभाजीनगर अशा नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करून फाईल केंद्राकडे पाठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या सहीने या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले, याचा आवर्जून उल्लेख फडणवीसांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न त्यांच्या मुलाला, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असतांना पूर्ण करता आले नाही. ते अमित शाह यांनी पूर्ण केले, असे ठणकावून सांगत छत्रपती संभाजनगर नामकरणाचे श्रेय भाजपचेच असल्याचे फडणवीसांनी जाहीरपणे सांगितले.

एमआयएमवर हल्ला चढवतांना चुकीच्या पद्धतीने मतदान केले तर चुकीचा खासदार निवडून येतो, असा टोला फडणवीसांनी लगावला. संभाजीनगरातून जो खासदार निवडून आला त्याने कलम 370 च्या समर्थनासाठी हात उचलला होता का? राम मंदिराला, मोदींच्या योजनांना समर्थन दिलं होतं का? असा सवाल करत गेल्यावेळी केलेली चूक पुन्हा करू नका, असे आवाहनही फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपल्या भाषणातून केले.

ज्यांना आम्ही आपलं म्हणत होतो, ते ही त्यांच्याच रांगेत जाऊन बसले आहेत. मोदींजींच्या चारशे जागांमध्ये संभाजीनगरचा खासदार सोबत असणार आहे का? यावेळी चूक करू नका. काही थेट विरोधात येतील, काही कॅलेंडरमध्ये 'जनाब' लिहणारे बहुरुपी येतील, पण त्यांना थारा देऊ नका, असा टोलाही फडणवीसांनी ठाकरे गटाला लगवाला.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Loksabha Election 2024 : अब की बार चारसौ पार नव्हे; हे 420 सरकार होणार हद्दपार!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com