Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने चारसौ पारचे मिशन निश्चित केले आहे. त्यानुसार पक्ष संघटना कामाला लागल्या असून कश्मीर मधून 370 कलम हटवल्याच्या निमित्ताने प्रत्येक बूथवरती अधिकचे 370 मतदार जोडण्याचा कार्यक्रम भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून देण्यात आला आहे. यावरून आता विरोधकांकडून टीकेचे जोड उठवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
आयुष्मान भारत योजनेची जाहिरात आपल्या माथी मारण्यासाठी मोदी सरकार आपल्याच खिशातून कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. प्रत्यक्षात मात्र ही योजना गोरगरीब रुग्णांना नव्हे तर केवळ विमा कंपन्यांना फायदा देणारी आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णांना अक्षरशः रुग्णालयांच्या दारात पडून राहावे लागत आहे.
गोरगरीब रुग्णांचे हाल होत असताना योजनेत सुधारणा करायचे सोडून मोदी सरकार केवळ जाहिरातबाजीत मग्न आहे. मोदी सरकारच्या धोरणाच्या विरोधात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने केईएम हॉस्पिटल चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. विविध घोषणा देत केंद्र सरकारच्या योजना व धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी जगताप म्हणाले, सध्याचे राज्यातील आणि केंद्रातील परिस्थिती बघता महायुतीच महायुतीला पराभूत करेल असा चित्र आहे. गेल्या आठवड्यामध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सभेमध्येच त्या ठिकाणच्या तालुकाध्यक्षांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे. हर्षवर्धन पाटील गेल्या 30-35 वर्ष इंदापूरचे सक्षम नेतृत्व करत आहेत आणि त्यांना अशा प्रकारे धमकवणे हे सत्तेचा माज आल्याचे प्रतीक आहे. या सर्व प्रकारांना आगामी निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल असं जगताप म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जगताप पुढे म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी भाजपाने आपकी बार 400 पार असा नारा दिला आहे. मात्र हे सरकार चारसौबीसी करणार आहे. त्यांचा खरा आकडा हा 420 आहे. जनतेने हे ओळखले आहे. त्यामुळे 400 नाही आणि 370 नाही यावेळी जनता या 420 सरकारला हद्दपार करे असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. पक्षाने घर फोडणाऱ्या पक्षाला बारामतीची जनता यावेळी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि सुप्रिया सुळे यांनी केलेल्या पंधरा वर्षाच्या कामाची पोचपावती बारामतीकर त्यांना देतील असं जगताप म्हणले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.