Babanrao Lonikar : महाविकास आघाडी सरकार पांढऱ्या पायाचे त्यांच्यामुळेच मराठा आरक्षण गेले; भाजप नेत्याचा अजब दावा

Babanrao Lonikar Maratha reservation MVS : मराठवाड्यात महायुतीला आलेल्या अपयशावर यंदाची निवडणुकही विकासावर झाली नाही. ती जातीपातीच्या मुद्यावर झाली, असा दावा लोणीकर यांनी केला.
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadisarkarnama

Babanrao Lonikar News : मराठा आरक्षण महाविकास आघाडीच्या काळात सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यावरून महाविकस आघाडी सरकार पांढऱ्या पायाचे आहे. त्यांच्यामुळे मराठा व ओबीसी आरक्षण गेले, असा अजब दावा भाजप नेते बबन लोणीकर यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पांढऱ्या पायाचे सरकार आले आणि मराठा आरक्षण गेले, असे देखील बबन लोणीकर म्हणाले. परभणी दौऱ्यावर असताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनामुळे भाजपला फटका बसल्याची चर्चा आहे. मराठा नेत्यांची, आमदारांची बैठक घेत भाजपकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र, आता मराठा आरक्षण जाण्यास बबनराव लोणीकर Babanrao Lonikar यांनी थेट महाविकास आघाडीलाच जबाबदार धरले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Mahavikas Aghadi
Video OBC Reservation : "मराठा समाज फक्त 10 टक्के, OBC आरक्षणाला विरोध कराल, तर चुन-चुन के...", शिंदे सरकारला कुणी दिला इशारा?

मराठवाड्यात महायुतीला आलेल्या अपयशावर यंदाची निवडणुकही विकासावर झाली नाही. ती जातीपातीच्या मुद्यावर झाली, असा दावा लोणीकर यांनी केला. तसेच मराठा आरक्षण न मिळण्यास काँग्रेस Congress जबाबदार असल्याचा आरोप देखील लोणीकर यांनी केला. चाळीस वर्ष राज्यात मराठा मुख्यमंत्री असताना आरक्षणाची चर्चा झाली नाही, असे देखील लोणीकर म्हणाले आहेत.

संभाव्या मंत्रिमंडळ विस्तार आपल्याला मंत्रिपद मिळेल या बाबत आपण आशावादी माणूस आहोत. चांगल काम केलं तर संधी मिळेल, असे लोणीकर म्हणाले.

Mahavikas Aghadi
Murlidhar Mohol News : मंत्री अण्णा लागले कामाला; बैठकीत घेतले 'हे' महत्त्वपूर्ण निर्णय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com