Nanded News : मुठभर मराठा नेत्यांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस संपुर्ण समाजाकडे दुर्लक्ष करत आहेत. पण जातीच्या लोकांनी त्यांना दाखवून दिले आहे, तुम्ही नेत्यांना मोठं करा समाज तुम्हाला योग्यवेळी उत्तर देईल. मराठा समाजाला सरकार न्याय देणार नाही हे कळून चुकले आहे. त्यामुळे सरकारविरोधात समाजामध्ये रोष वाढत आहे.
मी अजूनही सांगतो देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमचे शत्रू नाहीत, पण त्यांनी आमच्या हक्काचे आरक्षण द्यावे, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.गावखेड्यातील समाज आमच्यासोबत आहे, अर्धा समाज सध्या पंढरपूरच्या वारीत विठुरायाच्या दर्शनाला गेला आहे, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.
गावखेड्यातील समाज आमच्यासोबत आहे, अर्धा समाज सध्या पंढरपूरच्या वारीत विठुरायाच्या दर्शनाला गेला आहे, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले. नांदेड येथील शांतता जनजागरण रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला. लाखोंच्या संख्येने सहभागी झालेल्या समाज बांधवांना अभिवादन करत निघालेल्या या शांतता रॅलीने नांदेड शहर दुमदुमले होते. राज्य सरकार मराठा समाजासोबत राजकारण करत आहे.
आमच्या हक्काचे आरक्षण (Reservation) देण्याऐवजी दोन समाजात भांडण लावण्याचा त्याचा अधिक प्रयत्न दिसतो. ओबीसींच्या काही नेत्यांना हाताशी धरायचे त्यांना मोठे करायचे, मराठा समाजाच्या काही नेत्यांना मोठे करायचे आणि दोन्ही समाजाकडे दुर्लक्ष करण्याचे सरकारचे धोरण आहे. पण आता हा सगळा डाव लोकांच्या लक्षात आला आहे, त्यामुळे यापुढे आता हे खपवून घेतले जाणार नाही, अशा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
मी खानदानी मराठा आहे, कुणाचा पैसा घेणार नाही, मला पद नको फक्त माझ्या मराठा समाजातील लेकरांना मोठ करायचंय. सत्ताधारी वेळ आली तर मला मारून टाकतील, त्यापेक्षा जास्त ते काही करू शकत नाहीत. मी समाजासाठी मरायला तयार आहे, पण आता थांबणार नाही, भूमिकेपासून मागे हटणार नाही, असेही जरांगे यांनी ठणकावून सांगितले.
मराठा समाजाला, आमच्या पोरांना त्यांच्या हक्काचं मिळाव यासाठी माझा लढा सुरू आहे. मला यातून पैसे कमवायचे नाहीत, माझा हेतू प्रामाणिक आहे आणि ही गोष्ट माझ्या समाजाच्या लक्षात आली आहे. हा आपल्या मुलांसाठी धडपडतोय आणि त्यालाच आता सरकारने चारही बाजूंनी घेरलं आहे हे ही समाज पाहतोय. त्यामुळे समाज माझ्या पाठीशी आणखी मजबुतीने उभा राहिला आहे, ते मला एकटं पडू देणार नाही, असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
ज्या मराठ्यांच्या जीवावर राज्यातील नेते मोठे झाले, त्यांनी फक्त आपल्या मुलांच भलं केलं, त्यांनाच मोठं केलं हे समाजाच्या लक्षात आले आहे. सत्ता आणि मंत्रीपदासाठी त्यांच्यात सुरु असलेली स्पर्धा याकडे समाज पाहतो आहे. आता नेत्यांना, त्यांच्या मुलांना नाही तर आपल्या मुलांना आरक्षणाच्या माध्यमातून अधिकारी करायचे आहे. मनोज जरांगे आपल्या मुलांसाठी लढतोय, झटतोय हे समाजाने ओळखले आहे म्हणून ते माझ्या बाजूने उभे आहेत, असेही जरांगे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.