Worli Hit And Run Case Update : वरळी हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी पोलिसांना झटका; आरोपीच्या वडिलांची अटक बेकायदेशीर

Mumbai Police : वरळीत अपघात करणारा मुख्य आरोपी मिहीर शहा अद्याप फरार आहे. मुंबई पोलिसांनी मात्र त्याचे वडील आणि शिंदे गटाचे नेते राजेश शहा यांना अटक केली.
Worli Hit And Run Accident
Worli Hit And Run AccidentSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Crime News : वरळी हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणी पोलिसांनी ओरपी मिहीर शहाचे वडील शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतले होते. मात्र ओरपी पसार असताना वडिलांना अटक करणे हे बेकायदेशीर असल्याचे ठरवले.

त्यांना 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे हा मुंबई पोलिसांना झटका मानला जात आहे.

वरळीत अपघात करणारा मुख्य आरोपी मिहीर शहा अद्याप फरार आहे. मुंबई पोलिसांनी मात्र त्याचे वडील आणि शिंदे गटाचे नेते राजेश शहा यांना अटक केली. त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता ही अटकच बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने सांगितले. तसेच त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर राजेश शहा यांनी जामिनासाठी अर्ज केला. त्यानुसार न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आता या अपघाताचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात मिहीर शहा याला अपघात झाल्याचे समजल्याचे स्पष्ट होत आहे. त्यानंतरही त्याने कार सुसाट पळवली. तर कारच्या बोनेट आणि चाकात अडकलेल्या कावेरी नाकवा यांना बाजुला केल्यानंतरही मिहीरने त्यांच्या अंगावर कार चढवल्याचे दिसत आहे. याबाबत पोलिसांनी कोर्टात माहिती दिली.

Worli Hit And Run Accident
Laxman Hake Vs Manoj Jarange : मुख्यमंत्री शिंदे-मनोज जरांगे यांची मिलीभगत..; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप

वरळीत अपघात केल्यानंतर मुख्य आरोपी मिहीर फरार असून पोलिसांनी त्याच्याविरुधात लूक ऑउट नोटीस जारी केली. आरोपी मिहीर शाहाने या अपघातात मासेमारी व्यावसायिक महिलेला दोन किलोमीटरपर्यंत फरपटत नेले होते. त्याने कार थांबवली असती तर पत्नी वाचली असती, असे अपघातातून वाचलेल्या पतीने सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Worli Hit And Run Accident
NCP Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठी लढाई जिंकली! निवडणूक आयोगाचा पक्ष आणि चिन्हाबाबत मोठा निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com