Eknath Shinde : शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सुरूच; ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के...

Political News : शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर मुंबई महापालिकेतील जवळपास 50 माजी नगरसेवकांनी आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Uddhav Thackeray, Eknath Shinde
Uddhav Thackeray, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे पारडे जड राहील अशी अनेकांचे मत होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील अनेक इच्छुक मंडळीने महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करीत उमेदवारीही मिळवली होती. मात्र, चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. भाजपचे 132 तर महायुतीचे 232 आमदार निवडून आले. त्यामुळे महायुतीसोडून गेलेल्या अनेकांचा भ्रमनिरास झाला. त्यातच आगामी काळात होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील घटक पक्षांमध्ये मोठी अस्वस्था पसरली आहे.

महाविकास आघाडीचे अनेक नेते पक्षांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत मोठे इनकमिंग वाढले आहे. दुसरीकडे त्याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसला आहे. शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर मुंबई महापालिकेतील जवळपास 50 माजी नगरसेवकांनी आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यासोबतच अनेक पदाधिकारी, आजी-माजी नेतेमंडळी, दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेसोबत जाणे पसंत केले आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
MLC Election : मोठी बातमी : विधान परिषद पोटनिवडणुकीत एक अर्ज बाद, आमदारकीचे स्वप्न भंगले

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी महाविकास आघाडीची साथ सोडत महायुतीसोबत जात आहेत. गेल्या काही दिवसातील राजकीय घडामोडी पहिल्या तर आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन प्रवेश होताना दिसत आहेत.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
MLC Election : डावलेल्या इच्छुकांनी नाराजी झटकली; 21 जागांवर डोळा ठेवत सुरु केली आमदारकीची तयारी!

मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर ठिकाणच्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्याची तयारी काही पक्षांनी आतापासूनच सुरु केली आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबतच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देखील मोठी गळती लागली आहे. अनेक माजी आमदारासोबतच दुसऱ्या फळीतील नेतेमंडळी शिंदेंच्या शिवसेनेत (Shivsena) अथवा भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Opposition Leader News : ठाकरेंनी ताकद लावली पण या अधिवेशनात तरी विधानसभेचा विरोधी पक्षनेता मिळणार का?

एकीकडे मुंबईत शिवसेना ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिला आहे, तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटही अधिक्र सक्रिय होऊन शिंदे सेना ठाकरे गटाला धक्के देत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच महायुतीत सुरू झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी ‘ऑपरेशन टायगर’संदर्भात भाष्य करताना काही माजी आमदार व खासदार आमच्या संपर्कात असून, लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल, असा दावा केला होता. त्यानुसार, आता पडद्यामागून शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Devendra Fadnavis : ...तेच माझे लाडके मंत्री; फडणवीसांचे मोठे विधान

विधानसभा निवडणुकीत आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचा मोठा पराभव झाला होता. त्यानंतर गड असलेल्या कोकणात मोठे धक्के उद्धव ठाकरे यांना बसले. येत्या काळात राज्यातील महापालिकेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरसेवक आपल्याकडे वळवून घेण्यासाठी महायुतीतील सर्वच पक्ष प्रयत्न करीत आहेत. त्यातच आता शिवसेना शिंदे गटाने ऑपरेशन टायगर सुरु केले आहे.

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Devendra Fadnavis : फडणवीस 'चौकट' पूर्ण करणार; तीन 'पीए'नां आमदार केलं; चौथाही उतरवला रेसमध्ये...

गेल्या काही दिवसात राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर आता शिवसेनेचे ॲापरेशन टायगर पुन्हा सक्रीय झाले आहे. त्यानंतर पुण्यातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तत्पूर्वी पुणे जिल्ह्यातील अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी देखील प्रवेश केला. वैजापुर-गंगापुर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु झाल्याने चर्चा रंगली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Uddhav Thackeray, Eknath Shinde
Eknath Shinde : PM मोंदी अन् उद्धव ठाकरेंबाबत एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com