Vilas Ghule Murder : घुले कुटुंबीयांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंचा प्रश्न : एका आरोपीचे लाड का? आता मी विधानसभेत स्वस्थ बसणार नाही...

Dhananjay Munde Meet Ghule family : विलास घुले खून प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. उमेश माने याला वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांची हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Dhananjay Munde Meet Ghule family
Dhananjay Munde Meet Ghule family Sakarnama
Published on
Updated on

Beed, 26 June : विलास घुले याच्या खून प्रकरणातील सर्व आरोपींना अटक व्हावी, अशी कुटुंबीयांची मागणी आहे. एसटी समाजातील उमेश माने याला मारण्यासाठी काही लोक ठरवून घुले यांच्या गावकरी हॉटेलमध्ये आले. मानेला सोडविण्यासाठी हॉटेलमालक विलास घुले गेला, त्यावेळी मानेला सोडून सर्वांनी विलास घुले याचा खून करण्यात आला.

माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, विलास घुले खूनप्रकरणी नऊ आरोपींना अटक केली आहे. पण पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली नाही. तो पोलिसांचा का लाडका आहे, हे मी ज्या व्यासपीठावर बोलायचे ते बोलेन. पण, ३०२ मध्ये एका आरोपीला का अटक होत नाही, कारण त्याची वेगळी तपासणी सुरू आहे म्हणून. त्या एका व्यक्तीला या केसमधून पोलिसांना बाहेर काढायचं आहे. म्हणून त्याला बाहेर ठेवलं आहे का. साक्षी, पुरावे नष्ट करण्यासाठी या ३०२ मधील आरोपीला बाहेर ठेवण्यात आले आहे. हा माझा पोलिस प्रशासनाला प्रश्न आहे.

विलास घुले खूनप्रकरणाचा तपास योग्य दिशेने चालू आहे. पण एका व्यक्तीला अटक करण्यासाठी पोलिस धजावत नाही. तो मोठ्याचं लेकरू आहे म्हणून. आमची कोणाशीही दुश्मनी नाही. जाती, पातीचा आणि धर्माचा विषय नाही. विषय हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. ते जर गुन्ह्यात सामील असतील तर त्यांनाही अटक करावीच लागेल. त्यांना मोकळं का सोडलं आहे, असा सवालही मुंडे यांनी केला.

आता भीती अशी आहे की, जो आरोपी मोकळ आहे, त्याने साक्षी, पुरावे, इव्हिडन्स टॅम्पर केले तर यातून बाहेर काय येणार आहे. पोलिस एका आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळेच ते त्याला अटक करत नाहीत, असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.

Dhananjay Munde Meet Ghule family
Maharashtra Government : राज्यातील 84 हजार आशा सेविकांसह 21 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांसाठी लवकरच महत्वपूर्ण निर्णय

ते म्हणाले, त्या मोकाट आरोपीलासुद्धा पोलिसांना अटक करावीच लागेल, एवढ्या ताकदीनं आम्हीसुद्धा आता रस्त्यावर उतरू. आम्हीसुद्धा आता शांत बसणार नाही. एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय...आतापर्यंत या बीड जिल्ह्यात २२ खून झाले आहेत. दुर्दैव या बीड जिल्ह्याचं की फक्त एसपीला आडनाव लावायचा अधिकार आहे. बाकी कुठल्याही पोलिसांना आडनाव लावायचा अधिकार नाही. आम्ही सामाजिक सलोखा जपून कोणाचंही मन जपून वागतो.

Dhananjay Munde Meet Ghule family
Pune Sarthi News: 'सारथी'च्या कार्यक्रमात मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद? खासदार मेधा कुलकर्णी यांचे CM फडणवीसांच्या लाडक्या आमदारावर गंभीर आरोप

मारायला दाखवायचं एकाला आणि खून करायचा एकाचा. या प्रकरणाचा सूत्रधाराबाबत अनेकांनी साक्ष दिली आहे. मात्र, ती पोलिसांना पटत नाही. मग पोलिसांनी आणखी कोणती साक्ष पाहिजे. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात हा मुद्दा मी मांडला आहे. न्याय सर्वांना सारखा मिळावा म्हणून विधानसभेत हा मुद्दा सोमवारी मी मांडणार आहे. एका आरोपीचा लाड का, असा माझा प्रश्न आहे, असेही मुंडेंनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com