Pune Sarthi News: 'सारथी'च्या कार्यक्रमात मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद? खासदार मेधा कुलकर्णी यांचे CM फडणवीसांच्या लाडक्या आमदारावर गंभीर आरोप

BJP controversy : पुण्यात शुक्रवारी (ता.26) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरुन भाजप नेत्यांमध्ये शा‍ब्दिक चकमक उडाली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असं म्हटल्यानं दुखावलेल्या मेधा कुलकर्णी या कार्यक्रमातून तडकाफडकी निघून गेल्या.
Medha Kulkarni allegation
Medha Kulkarni allegationSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील सारथीच्या युपीएससी, एमपीएससीतील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान कार्यक्रमात मुख्यमंत्री करण्यात आला. सारथीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण याच कार्यक्रमावरुन भाजप आमदार आणि राज्यसभा खासदार यांच्यात मोठा वादंग निर्माण झाला आहे.यामुळे सारथीत मराठा विरुद्ध ब्राह्मण वाद पेटण्याची शक्यता आहे.

पुण्यात शुक्रवारी (ता.26) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरुन भाजप नेत्यांमध्ये शा‍ब्दिक चकमक उडाली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही असं म्हटल्यानं दुखावलेल्या मेधा कुलकर्णी या कार्यक्रमातून तडकाफडकी निघून गेल्या.

आता राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी या वादानंतर स्वतंत्र पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडतानाच भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या, या कार्यक्रमात पहिल्या रांगेत काही रिकाम्या खुर्च्या होत्या. त्यावेळी माधुरी मिसाळ किंवा अन्य मंत्रिमहोदय आलेले नव्हते. त्यामुळं खुर्च्या रिकाम्या होत्या. अभिमन्यू पवारांना पहिल्या रांगेत बसायचं होतं, म्हणून ही धावाधाव चालली होती असं कुलकर्णी यांनी सांगितलं.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, सारथीच्या या कार्यक्रमात नरेंद्र पाटील यांना पुढे बसू द्यावं अशी माझी इच्छा होती. कारण ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, माजी आमदार आहेत. मात्र, अभिमन्यू पवार यांना असं वाटत होतं की ते स्वत: पुढे बसतील असंही त्यांनी सांगितलं.

Medha Kulkarni allegation
Medha Kulkarni: मुख्यमंत्र्यांच्या समोरच भाजप नेत्यांमध्ये उडाले खटके; आमदाराचा 'तो' टोमणा अन् संतापलेल्या मेधा कुलकर्णींनी कार्यक्रमच सोडला

हा कार्यक्रम मराठा समाजातील अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांना साथ देणाऱ्या सारथी संस्थेचा होता. एका चांगल्या भावनेनं मी या कार्यक्रमाला गेले होते. पण मला वाईट वाटतं की, माझ्या जातीला चुकीच्या पद्धतीने ट्रीट करून गालबोट पवार यांनी लावल्याचा आरोपही मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केला.

अभिमन्यू पवारांचा पलटवार

या कार्यक्रमानंतर भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी या घटनेवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘मेधाताईंचा गैरसमज झाला आहे, मी त्यांना एवढेच म्हटलं की, नरेंद्र पाटील पुढे बसतील. कारण, ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण दोघं मागे बसू मी त्यांना एवढेच बोललो आहे, यात कुठल्याही जातीचा विषय किंवा वाद नसल्याचं पवार यांनी म्हणत आपली बाजू सांगितली.

Medha Kulkarni allegation
Mayank Lohar Murder Case : माझ्या मुलाचा मारेकरी पुन्हा जीव घेईल… त्याचा एन्काऊंटर करा! मयंक लोहारच्या वडिलांची एकनाथ शिंदेंकडे थेट मागणी

अभिमन्यू पवारांनी मेधा कुलकर्णी यांना हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही पुढे बसू नका, कारण त्यामुळे वाद होईल. हा कार्यक्रम शासनाचा आहे, एका जातीचा नव्हे. आणि शासकीय प्रोटोकॉलनुसार खुर्च्यांची रचना केलेली असते. जात बघून रचना केलेली नसते, असा टोलाही मेधा कुलकर्णी यांनी पवार यांना लगावला.

तसेच यावेळी त्यांनी मेधाताईंना देखील विनंती करतो की, मी काय बोललो ते तुम्ही आठवून बघा असं म्हटलं. हा कार्यक्रम माझ्या घरचा नाही, त्या माझ्या नेत्या आहेत, वरिष्ठ आहेत. त्यानंतर देखील माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. पण कार्यक्रमातून निघून जावं की बसावं हा त्यांचा विषय असल्याचा प्रत्युत्तरही अभिमन्यू पवार यांनी मेधा कुलकर्णी यांना दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com