Dhananjay Munde Dasara Melava : धनंजय मुंडेंनी टाइमिंग साधत मनोज जरांगे पाटील, सुरेश धस यांना अंगावर घेतले!

Dhananjay Munde Target MLA Suresh Dhas : जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाल्यापासून पंकजा - धनंजय मुंडे या बहीण भावांसोबतचे आमदार सुरेश धस यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध संपुष्टात आले.
Dhananajy Munde Criticise Suresh Dhas-Manoj Jarange Patil News
Dhananajy Munde Criticise Suresh Dhas-Manoj Jarange Patil NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंनी मनोज जरांगे पाटील व आमदार सुरेश धस या दोघांवर एकाचवेळी टीका केली.

  2. आरक्षण व राजकारणाच्या मुद्द्यावरून मुंडेंनी घणाघाती प्रहार करून वातावरण पेटवलं.

  3. या भाषणामुळे मराठा समाज व राजकीय वर्तुळात चर्चेचा नवा धडाका सुरू झाला.

Beed Political News : अडीचशे दिवस शांत बसलेल्या आमदार धनंजय मुंडे यांनी आज दसरा मेळाव्याचा मुहूर्त साधत विरोधकांना अंगावर घेत आपली पुढील दिशा कशी राहील? याचे स्पष्ट संकेत भगवान भक्तीगडावर केलेल्या आपल्या रोखठोक भाषणातून दिले. माझा गुन्हा नसताना मला सगळं भोगावं लागलं, अशी मनातील सल बोलून दाखवताना गेल्या दसरा मेळाव्याला व्यासपीठावर हजेरी लावणाऱ्या आणि आज पाठ फिरवणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांच्यावरही धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला.

2024 मध्ये झालेल्या दसरा मेळाव्याला भगवान भक्तीगडावर आमदार मेघना बोर्डीकर, सुरेश धस, माजी खासदार सुजय विखे, लक्ष्मण हाके, मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डिले, भीमराव धोंडे, बाळासाहेब आजबे यांच्यासह अनेक नेते आवर्जून उपस्थित होते. यंदाच्या दसरा मेळाव्यात मात्र आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. ओबीसीतून मराठा आरक्षणाची आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेली मागणी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष हत्या या दोन घटनांमुळे बीड जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण तापले.

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देत सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी राज्यभरात न्याय मोर्चे काढले होते. या मोर्चाच्या व्यासपीठावरून सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना लक्ष्य केले होते. धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद घालवण्यात या दोन नेत्यांचा मोठा वाटा होता. धस जाहीर भाषणातून एका नेत्याची विकेट काढली, तीही क्लीन बोल्ड असे सांगतात. जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झाल्यापासून पंकजा - धनंजय मुंडे या बहीण भावांसोबतचे आमदार सुरेश धस यांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध संपुष्टात आले.

Dhananajy Munde Criticise Suresh Dhas-Manoj Jarange Patil News
Pankaja Munde Dasara Melava : धक्कादायक! पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले! पाठींब्यासाठी...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत धस यांच्या आष्टी मतदार संघात विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्यात पंकजा मुंडे मंत्री म्हणून सहभागी झाल्या होत्या. यावेळी केलेल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांच्याशी सोबत असलेल्या कौटुंबिक संबंधांचा उल्लेख करत ते आता मला बोलवत नाही, अशी टीका केली होती. गेल्या वर्षभरात घडलेल्या जिल्ह्यातील राजकीय घडामोडी याचा परिणाम पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यातील व्यासपीठावरून अनेक चेहरे गायब होण्यात झाला. त्यापैकीच एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे आमदार सुरेश धस.

Dhananajy Munde Criticise Suresh Dhas-Manoj Jarange Patil News
Pankaja Munde Dussehra Melava: जानकर, धनुभाऊ ते लक्ष्मण हाके... दसरा मेळाव्याला पंकजा मुंडेंच्या स्टेजवर OBC नेत्यांची गर्दी

पंकजा मुंडे यांनी धस यांचा उल्लेख टाळला असला तरी धनंजय मुंडे यांनी मात्र टाइमिंग साधत एकाचवेळी मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांना अंगावर घेतल्याचे दिसून आले. सुरेश धस यांच्या अनुपस्थितीकडे लक्षवेधत असताना मागच्या दसरा मेळाव्यातील अनेकजण आज दिसत नाहीत. पुढे निवडणुका नाही असं त्यांना वाटतंय, पण एक लक्षात ठेवा कोणी जर हा विचार घेऊन भगवान बाबांच्या भक्तांना, मुंडेंच्या कार्यकर्त्यांना संपवायला निघाले असतील तर त्यांना दहा जन्म संपवता येणार नाही, असा इशारा धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांचे नाव न घेता दिला.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी सुरेश धस यांना दिलेला हा इशारा महत्त्वाचा मानला जात आहे. याचाच दुसरा अर्थ असा की येणाऱ्या निवडणुकांमधून पुन्हा एकदा जिल्ह्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकणार.आपले मंत्रिपद सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे गेल्याची सल धनंजय मुंडे यांच्या मनात कायम आहे. आज ती स्पष्टपणे बोलून दाखवत मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून आले.

FAQs

Q1. दसरा मेळाव्यात धनंजय मुंडेंनी कोणावर टीका केली?
मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्यावर.

Q2. मुंडेंनी ही टीका का केली?
मराठा आरक्षण व राजकीय मुद्यांवरून.

Q3. मुंडेंनी भाषणात काय ठळक विधान केलं?
"कोणाला फसवतायं? गेल्यावेळचे चेहरे व्यासपीठावर दिसत नाहीत, अशा शब्दांत थेट सवाल केला.

Q4. या भाषणाचा सर्वाधिक परिणाम कोणत्या समाजात जाणवला?
मराठा समाजात आणि राजकीय चर्चेत.

Q5. हा प्रसंग कधी आणि कुठे घडला?
दसरा मेळाव्यात 2025 मध्ये.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com