Pankaja Munde Dasara Melava : धक्कादायक! पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकले! पाठींब्यासाठी...

Walmik Karad Posters Pankaja Munde Dussehra Rally : पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडचे बॅनर झळकले.
Posters supporting Walmik Karad seen at Pankaja Munde’s Dussehra rally in Maharashtra.
Posters supporting Walmik Karad seen at Pankaja Munde’s Dussehra rally in Maharashtra.sarkarnama
Published on
Updated on

Walmik Karad News : मंत्री पंकजा मुंडे यांचा सावरगावमधील भगवान भक्तिगडावर दसरा मेळावा संपन्न होत आहे. पंकजा मुंडे या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित आहेत. मात्र, या मेळाव्याच्याआधीच जमलेल्या लोकांमध्ये वाल्मिक कराडचे बॅनर झळकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. बीडच्या तुरुंगात तो जेरबंद आहे. मात्र, पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यासाठी आलेल्या काही जणांनी हातात वाल्मिक कराड याचे पोस्टर झळकवले. पोस्टरवर आम्ही वाल्मिकअण्णाला पाठींबा देतो, असा मजकूर आहे.

कराडचे समर्थन करणारे पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आहे की नाही, याची माहिती मिळू शकली नाही.मात्र, मेळाव्यासाठी आलेल्या तरुणांनी असे पोस्टर झळकवत हत्येचा गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या आरोपीचे समर्थन केल्याने सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे.

Posters supporting Walmik Karad seen at Pankaja Munde’s Dussehra rally in Maharashtra.
Jalgaon Farmers Politics: पालकमंत्री गुलाबरावांचा शब्द हवेतच विरला, उन्मेश पाटील विमा कंपनी विरोधात पुन्हा मैदानात उतरले!

अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, मी एसपींना फोन करणार आहे. या कुठल्या टोळ्या आहेत जे पोस्टर झळकवत आहेत. त्यांना आतमध्ये घ्या. पोलिसांचा धाक उरला आहे की नाही. हत्येमधील आरोपीचे समर्थन केले जात आहे. मी पंकजा मुंडेंना विनंती करेल की तुम्ही याचा भाग नसाल तर हे चित्र बदलण्यासाठी पुढाकार घ्या.

Posters supporting Walmik Karad seen at Pankaja Munde’s Dussehra rally in Maharashtra.
Nilesh Ghaywal News : पोलिसांनी नाक दाबताच निलेश घायवळ गुडघ्यावर, पत्नी आणि मुलाला परत पाठवलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com