Dhananjay Munde Beed News : बीड जिल्ह्याने शरद पवारसाहेबांवर प्रेम केले ; पण त्यांनी काय दिले ?

Ajit Pawar Beed Sabha News : बीडमध्ये आज जी सभा होत आहे ती सभा १७ ऑगस्टला झालेल्या सभेची उत्तर सभा नाही.
Dhananjay Munde News
Dhananjay Munde NewsSarkarnama

Dhananjay Munde News : बीडमध्ये आज जी सभा होत आहे ती सभा १७ ऑगस्टला झालेल्या सभेची उत्तर सभा नाही. मी हे अनेकांना सांगितले. ही उत्तर सभा नसून 'उत्तरदायित्व' सभा आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची आणि दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी ही सभा आहे, असे सांगत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज (ता.२७ ) बीडमध्ये सभा होत आहे. यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, ''मागील सभेत म्हटले गेले की बीड जिल्ह्याने शरद पवारसाहेबांवर प्रेम केले. बरोबर आहे, बीड जिल्ह्याने पवारसाहेबांवर प्रेम केले पण पवारसाहेबांनी बीड जिल्ह्याला काय दिले, हा प्रश्नच आहे'' शरद पवार यांचे 'उत्तरदायित्व' विकासाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याला अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहे. म्हणून ही सभा 'उत्तरा'ची नाहीतर, 'उत्तरदायित्वा'ची आहे, असा मुंडे म्हणाले. मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर थेट टीका केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. मुंडे यांच्या टिकेची एकच चर्चा झाली.

Dhananjay Munde News
Beed politics : राजकीय परिस्थिती विचित्र ; धुरळा शांत होऊ द्या मग निर्णय घेऊ : जयदत्त क्षीरसागरांची सावध भूमिका

सभास्तळी येत असताना बीड शहरामध्ये अजित पवार यांचे ठिक-ठिकाणी स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावरून मुंडे म्हणाले, आज जे काही लोकांनी प्रेम दिले आहे. ते प्रेम पाहून आम्ही अजितदादांकडे जास्तीची मागणी केली तर वावगे ठरणार नाही. या सभेकडून बीडच्या जिल्ह्याला फार मोठ्या अपेक्षा आहेत. अनेक अपेक्षा अजित पवारांनी पुर्ण केल्या आहेत. म्हणून उगचच तुम्हाला 'एकच वादा अजित दादा' म्हणत नाहीत, असे मुंडे म्हणाले.

बीड (Beed) जिल्ह्याला अजित पवार यांनी माझ्या प्रेमा पोटी, किंवा या आधी जे सोबत होते, त्यांच्या प्रेमापोटी भरभरून दिले आहे. त्यामुळे ही सभा होत आहे. बीड जिल्ह्याला जर कुणी दिले असले तर ते अजित पवार यांनी दिले आहे. म्हणून ही सभा 'उत्तरा' ची नाहीतर, 'उत्तरदायित्वा'ची आहे. मी मोठ्या प्रमाणात संघर्ष केला. हे मी नाहीतर तर माझ्या दैवताने 'लोक माझे सांगाती' पुस्तकात लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की विधान सभेच्या विरोधी पक्षनेत्या पेक्षा, विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेत्याने चांगले काम केले.

Dhananjay Munde News
Nana Patole News : दंगली आणि दलित अत्याचाराचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवण्याचा भाजपचा डाव ; नाना पटोलेंचा आरोप

मला खात्री आहे की मला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद देण्याचा निर्णय अजित पवार यांनीच घेतला असले. मी जेव्हा भाजपमध्ये होते, तेव्हा मला विधान परिषदेची उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी मला दोन मत कमी पडत होती. ती मत मला अजित पवार यांनी मिळवून दिली, असेही मुंडे यांनी सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com