Nana Patole News
Nana Patole NewsSarkarnama

Nana Patole News : दंगली आणि दलित अत्याचाराचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवण्याचा भाजपचा डाव ; नाना पटोलेंचा आरोप

Congress News : हरेगावच्या घटनेतून भाजपने देशाच्या सामाजिक ऐक्याला गालबोट लावले, नाना पटोलेंची टीका

Mumbai News : नगर जिल्ह्यातील हरेगाव येथे दलित तरुणांना अर्धनग्न करून झाडाला उलटे टांगत नुकतीच (ता.२४) झालेली मारहाणीची घटना आता समोर आली आहे. ती माणुसकीला काळीमा फासणारी असल्याचे सांगत भाजपने आपल्या राजकीय फायद्यासाठी समाजात पसरवलेल्या द्वेषातून अशा घटना घडत आहेत, असा हल्लाबोल कॉंग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी रविवारी (ता.२७) मुंबईत केला.

हरेगावच्या घटनेतून भाजपने देशाच्या सामाजिक ऐक्याला गालबोट लावले आहे, अशी घणाघाती टीका पटोलेंनी केली. या प्रकाराचा तीव्र निषेध त्यांनी केला. राजकीय फायद्यासाठी भाजपने देशात पेरलेल्या द्वेषाच्या बीजातून देशवासियांना हे परिणाम भोगावे लागत आहेत, असे ते म्हणाले.

Nana Patole News
Jalgaon politics : शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी फोन आला ; नगरसेवकाने ठणकावले : उद्धव ठाकरे म्हणाले...

भाजपने (BJP) राजकीय फायद्यासाठीच हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून दंगली घडवल्या. त्यानंतर भाजपने सवर्ण आणि दलितांमध्ये फूट पाडण्याचे काम सुरु केले. त्यातून भीमा कोरेगावची दंगल घडवली, असा आरोप त्यांनी केला.

Nana Patole News
Ajit Pawar Beed News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक ; अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपशी संबंधित लोक सातत्याने मुस्लीम आणि दलितांबद्दल द्वेषाची पेरणी करत आहेत. त्यातूनच सामाजिक ऐक्याला तडे गेले असून हरेगावसारख्या घटना घडत आहेत, असा दावा पटोलेंनी केला. सरकारच्या कामगिरीवर मते मागायला तोंड नसल्याने भाजप आणि आरएसएस हे धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचे आणि दलित अत्याचाराचे गुजरात मॉडेल महाराष्ट्रात राबवण्याचा प्रयत्न करत आहे, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com