Maratha Reservation: जरांगे पाटील अन् मुंडे यांच्यात मध्यरात्री खलबतं;कुठल्या मुद्द्यावर चर्चा?

Dhananjay Munde Meet Manoj Jarange Patil Maratha Reservation News:मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली असल्याचे सुत्रांनी सांगितले. सुमारे तासभर मुंडे आणि जरांगे यांच्याच सुमारे तासभर खलबतं झाली.
Maratha Reservation news
Maratha Reservation newsSarkarnama
Published on
Updated on

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर घोंगडी बैठका सुरु आहेत. आज (रविवार) परळीमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटलांची शनिवारी मध्यरात्री गुप्तभेट घेतल्याचे समजते. बैठकीत काय चर्चा झाली, याचा तपशील मिळू शकला नाही.

परळीत बैठकीला परळी,अंबाजोगाई आणि माजलगाव परिसरातील मराठा बांधव मोठ्या प्रमाणात येतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली असल्याचे बोलले जाते.

अंतरवाली सराटी येथे मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली असल्याचे सुत्रांनी सांगितले. सुमारे तासभर मुंडे आणि जरांगे यांच्याच सुमारे तासभर खलबतं झाली. कुठल्या विषयावर चर्चा झाली हे गुलदत्त्यात आहे.बैठकीबाबत जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. "बैठकीत काही विशेष चर्चा झाली नाही. फक्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली,"

मी माझ्या मुद्द्यावर आजही ठाम आहे. गरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे यावर मी ठाम आहे. त्यांनीच आधी यावर सूचना काढली आहे. आमच्या तीनही गॅझेटवर चर्चा झाली होती, तेही त्या बैठकीत उपस्थित होते, असे जरांगेंनी स्पष्ट केलं.

"घोंगडी बैठक ताकदीने होणार आहेत, गरीब मराठा घरी बसणार नाही. जातीसाठी सगळी एकत्र येणार. मी आहे तो पर्यंत मी कोणाचाच होऊ शकत नाही. मी महाविकास आघाडीचा नाही आणि महायुतीचाही नाही. अंतरवली सराटी येथे कोणीही येऊ शकतो. मी फक्त मराठा समाजाचा आहे," असे जरांगे म्हणाले.

Maratha Reservation news
Chandrakant Patil: महापालिकेला जमलं नाही, एका आमदारानं करून दाखवलं!

काही दिवसांपासून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि जरांगे-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता जरांगे पाटलांना मराठा समाजाचा आमदार पाडून दिलीप सोपल यांना (Dilip Sopal) निवडून आणायचा विचार केला आहे का? मनोज जरांगेना कोणाची सुपारी मिळाली? असा सवाल राजेंद्र राऊत यांनी उपस्थित केला आहे.

जरांगे पाटलांच्या आवाहनामुळे लोकसभेत विरोधकांना झुकतं माप गेलं. त्यामुळे आता विरोधकांकडून ओबीसीतून (OBC) आरक्षण मागावे, ही त्यांची जबाबदारी आहे, असंही राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राऊत विरुद्ध जरांगे पाटील यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com