Dhnanjay Munde On Beed Loksabha News : लोकसभा लढवण्याची माझी लायकी नाही, मी अजून खूप लहान..

Marathwada : बीडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
Dhnanjay Munde, News Beed
Dhnanjay Munde, News BeedSarkarnama

Ncp : राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका आणि खलबते सुरू आहेत. (Dhnanjay Munde On Beed Loksabha News) बीड लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादीने इथे यावेळी अधिक जोर लावून तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अमरसिंह पंडीत, धनंजय मुंडे आदी नेत्यांची नावे पुढे येत आहेत.

Dhnanjay Munde, News Beed
New Parliament Building : नव्या संसदेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, "सर्वांना विचारात घ्यायला.."

धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांना लोकसभा निवडणुक लढवणार का? असा प्रश्न विचारला असता मात्र त्यांनी कानावर हात ठेवले. `माझ्यासाठी दिल्ली अजून लांब आहे, मी लोकसभा लढवणार नाही`, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी अशी कुठलीही शक्यता नसल्याचे सांगितले. (Beed) बीड लोकसभा मतदारसंघातून पीडीएफ, सीपीआय, काॅंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी या पक्षांनी आपले खासदार निवडून दिलेले आहेत.

२००९ पासून या मतदारसंघावर भाजपची पकड आहे. १९९९ ते २००४ दरम्यान, जयसिंगराव गायकवाड हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. (Ncp) त्यानंतर राष्ट्रवादीला बीड लोकसभेत यश मिळाले नाही. विद्यमान भाजप खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी ताकदीने लढण्याची शक्यता आहे. यासाठी उमेदवारांची चाचपणी देखील सुरू आहे.

यात माजी आमदार अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र धनंजय मुंडे हे लोकसभा लढवण्यास इच्छू नाहीत. त्यांनी तसे स्पष्टच सांगितले. माझ्यासाठी दिल्ली फार लांब आहे. मी लोकसभा निवडणूक लढविणार नाही. एखाद्याला अर्धा ग्लास भरलेला दिसतो, कोणाला रिकामा दिसतो. परळीत बॅनरवर संसद भवन लावल्यानंतर धनंजय मुंडे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील या चर्चेला उधाण आले होते.

मात्र आज बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या चर्चेवर धनंजय मुंडे यांनी अखेर पडदा टाकला आहे. लोकसभाचा उमेदवार म्हणून पक्षांनी माझ्यासोबत कसलीही चर्चा केली नाही. माझ्या दृष्टीने दिल्ली खूप दूर आहे. माझी लायकी लोकसभा लढविण्याची नाही. मी आणखीण खूप लहान असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान लोकसभा निवडणुकीत बीडमधून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com