Sharad Pawar on New Parliament Building : नव्या संसद भवनाचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांना या ऐतिहासिक सोहळ्याचे आमंत्रण दिले नसल्याने विरोधकांनी आजच्या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला. या उद्धघाटन सोहळ्यावर 21 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या या उद्धघाटन सोहळ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, " सध्या देशात जे काही सुरू आहे, ते लोकशाही विरोधी आहे. संसद भवन निर्मितीचा निर्णय घेताना आम्हाला विचारात घेण्यात आले नाही," हा सोहळा मर्यादित घटकांसाठीच होता की काय अशी शंका आहे, अशी टीका शरद पवारांनी यावेळी केली.
सर्वांना विचारात घ्यायला हवं होतं..
"विरोधी पक्षातील सभासदांना निमंत्रण दिलं की नाही माहीत नाही. माझ्या हातात निमंत्रण आले नाही.पण माझ्या दिल्लीच्या घरी पाठवलं असेल तर मला माहित नाही. पण माझ्या हातात निमंत्रण आलं नाही. असा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे की नाही हे सरकारने संसदेत मांडलं नाही.या प्रकल्पाबाबतची चर्चा मर्यादित लोकांशी केली असावी. पण आम्हाला सांगितलं नाही. इतकी मोठी गोष्ट करताना त्यांनी सर्वांना विचारात घ्यायला हवं होतं," असे पवार म्हणाले.
जुन्या संसदेचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न..
पवार म्हणाले, "दिल्लीत कोणीही आले तर नव्या माणसाला संसद, राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट दाखवले जातात. संसदेचं एक्झिबिशन आहे. त्याला लोक भेटतात. त्यातून देशाचा इतिहास मांडला जातो. त्याचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न आहे का अशी शंका आहे. जी जुनी संसद आहे. त्याबद्दल आमची आस्था आहे. आमची बांधिलकी आहे,"
हे काय आहे..
या नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर काही विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राष्ट्रीय जनता दलाने संसदेच्या या नव्या इमारतीवरुन टि्वट करीत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
राष्ट्रीय जनता दलाने या नवीन संसद भवनाची तुलना शवपेटी (Coffin) सोबत केली आहे. राजदच्या टि्वट हॅडलवरुन दोन फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. एकीकडे ताबूत तर दुसरीकडे नवी संसद भवनाचा फोटो शेअर करीत तुलना केली आहे. 'हे काय आहे," असा प्रश्न राजदनं उपस्थित केला आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.