Dhananjay Munde News : अडचणीच्या काळात आजही धनंजय मुंडेचा नंबर आठवतो, यापेक्षा आणखी काय हवयं?

Dhananjay Munde: My Number Is Still Remembered in Crisis, Minister Post Not Important : धनंजय मुंडेवर टीका करा, धनंजय मुंडे चुकला असेल तर त्याला कधीच माफ करू नका. तो विषय धनंजय मुंडेपर्यंत असावा, माझ्या जातीपर्यंत नसावा.
EX Minister Dhananjay Munde News
EX Minister Dhananjay Munde NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी खात्यातील साहित्य खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. न्यायालयाने या प्रकरणात नुकतीच मुंडे यांना क्लीन चीट दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची नाहक बदनामी झाली, त्यांच्या कुटुंबियांना त्रास सहन करावा लागला, असे म्हणत त्यांना पुन्हा मंत्रीमंडळात घेण्याचे संकेत दिले. तर दुसरीकडे ठाणे येथील वंजारी समाजाच्या अधिवेशनात धनंजय मुंड यांनी कृतज्ञता व्यक्त करताना अडचणीच्या काळात आजही ज्याला धनंजय मुंडेचा नंबर आठवतो यापेक्षा आणखी काय हवयं? मंत्रीपद चाटायचयं का? असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

संघर्षाच्या काळात समाजाने डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. या समाजाचा आणि त्यात मी जन्माला आलो याचा अभिमान असल्याचे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या भाषणात सांगितले. वंजारी समाजाच्या अधिवेशनात भाषण करताना धनंजय मुंडे भावूक झाले होते. गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत संघर्षाच्या काळात सावलीसारखा होतो. त्यांचा संघर्ष मी बघितला, त्या संघर्षातून ते जिथपर्यंत पोहचले तेही पाहिले. जे व्हायला नको होत ते झालं, पण कधी-कधी वाटत की साहेबांची दूरदृष्टी किती होती, मला जर बाजूला केलं नसतं तर एका मंत्री मंडळात बहीण-भाऊ मंत्री झाले नसते, असेही मुंडे म्हणाले.

गेल्या दोन महिन्यात आपल्या बाबतीत जे घडलं ते कठीण होतं. टीका स्वीकारेन, व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेवर टीका करा, धनंजय मुंडे चुकला असेल तर त्याला कधीच माफ करू नका. तो विषय धनंजय मुंडेपर्यंत असावा, माझ्या जातीपर्यंत नसावा. (NCP) जिल्ह्यापर्यंत आई, बाप, मुलाबाळापर्यंत तो नेला गेला हे यापुर्वी कधीच झाले नाही. माझ्यासह, जात, इतर समाज, जिल्ह्याची एवढी बदनामी का केली? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थितीत केला. दोनशे दिवस एखाद्या जिल्ह्याची, व्यक्तीची त्याच्या जातीची मीडिया ट्रायल कधीच कोणी केली नाही, ते मी सहन केले.

EX Minister Dhananjay Munde News
Manoj Jarange Patil On Dhananjay Munde : वाल्मीक कराडला पाठिंबा देणाऱ्याला मंत्री करायला निघालात! अजितदादा ही विनाशकाले विपरीत बुद्धीच..

त्या दोनशे दिवसात मी दोन वेळा मरता-मरता राहिलोय. तुमच्या कृपेमुळे आणि आशिर्वादामुळेच जिवंत आहे. ज्या समाजात जन्माला आलो, त्याचा अभिमान निश्चित आहे. अडचणीच्या काळात ज्याला धनंजय मुंडेंचा नंबर आठवतो, यापेक्षा दुसरं काय हवं? मंत्रिपदाला काय चाटायचं आहे का? असेही धनंजय मुंडे म्हणाले. माझ्यावर कृषिमंत्री असताना आरोप केले गेले. नियतीने, न्यायव्यवस्थेने न्याय दिला. ज्यांनी षडयंत्र केलं त्यांनाच न्यायालयाने लाख रुपयाचा दंड ठोठावला.

EX Minister Dhananjay Munde News
Dhananjay Munde: सर्वात मोठी बातमी: धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? खुद्द अजित पवारांनीच दिले संकेत

संघर्षात संयम ठेवायचा..

सत्य परेशान हो सकता है, पराजित नही असे म्हणत पुढेही संघर्षातून, संकटातून जावं लागेल. संघर्षात काय करायचं तर संयम ठेवायचा. गप्प राहिलो नसतो तर मला जो आजार झाला, तो आला नसता. माझा स्वभाव व्यक्त होण्याचा आहे. माझ्या वाणीवर सुद्धा सरस्वती मातेची कृपा आहे. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होईपर्यंत कधीच साहेबांच्या स्टेजवर मी नसायचो. संघर्षाच्या काळात आपण माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिले. माझ्या स्वत:च्या अंगाची, मा‍झ्या कातड्याची जोडी जरी करून तुमच्या पायात घातली तरी उपकार फेडू शकत नाही, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी समाजाचे आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com