Dhananjay Munde Beed : काम करू द्या, सत्कार सोहळे नकोत; बीडमध्ये येताच धनंजय मुंडेंचा धडाका

Beed Guardian Minister : हार, फुलांचे जेसीबी सारले बाजूला
Dhananjay Munde
Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed Political News : राज्याच्या मंत्रिमंडळात निवड झाल्यानंतर जिल्ह्यात आलेल्या धनंजय मुंडे यांचे आष्टी ते परळी सर्वत्र जंगी स्वागत झाले. पोकलेनमधून पुष्पवृष्टी, जेसीबीने हार घालण्यात आले. मात्र, पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात आलेल्या धनंजय मुंडे यांनी हार-तुरे आणि सत्कार सोहळे नको, मला काम करू द्या, असे म्हणत फक्त निवेदने स्वीकारली. (Latest Political News)

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) दुसऱ्यांदा मंत्री आणि दुसऱ्यांदा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी मंत्रिपदी निवडीनंतर जिल्ह्यात प्रथम येताना धनंजय मुंडे यांचे आष्टी ते परळी असे सर्वत्र जंगी स्वागत झाले होते. पूर्ण दिवसभर ते हारतुरे स्वीकारत होते. मात्र, आता पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात येताना त्यांनी सत्कार, हार तुऱ्यांना नकार देत केवळ निवेदने स्वीकारली. तसेच विविध प्रश्न घेऊन आलेल्या नागरिक, महिलांशी संवाद साधला.

Dhananjay Munde
PCMC News : शरद पवार राष्ट्रवादीने भाजप अध्यक्षांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात ललकारले !

जिल्ह्याची हद्द असलेल्या आष्टी तालुक्यापासून अनेक ठिकाणी समर्थक धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी उभे होते. धनंजय मुंडे यांनी गाडीतून खाली उतरून फुलांनी भरलेले जेसीबी बाजूला काढायला लावले. दौलावडगाव, चिंचपूर, धामणगाव, अमळनेर, म्हसोबाची वाडी, हातोला, जवळागिरी, गणेशगड, लिंबा देवी फाटा अशा अनेक ठिकाणी त्यांनी सत्कार नाकारले. या वेळी त्यांनी फक्त लोकांनी दिलेली निवेदने स्वीकारली. (Maharashtra Political News)

या वेळी मंत्री मुंडेसोबत आमदार बाळासाहेब आजबे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. शिवाजी राऊत, अण्णासाहेब चौधरी, विठ्ठल सानप आदी होते.

(Edited by Sunil Dhumal)

Dhananjay Munde
Pandharpur-Mangalveda Politics : पंढरपूर-मंगळवेढ्यात भालकेंच्या माध्यमातून बीआरएसचा करिश्मा चालणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com