भाजपकडे १२० आमदार असूनही... मुंडेंनी फडणवीसांना डिवचले

Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
Devendra Fadnavis, Dhananjay Munde
Devendra Fadnavis, Dhananjay Mundesarkarnama
Published on
Updated on

Dhananjay Munde : मुंबई : भाजपकडे १२० आमदार असूनही उपमुख्यमंत्रीपद मिळाले. भाजपला उपमुख्यमंत्रीपदावरच समाधान मानावे लागले. मग नवे सरकार आणून यांना काय फायदा झाला? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी भाजपला (BJP) गेला. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही टोला लगावला.

विरोधी पक्षनेते अजित पवार आज बीज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे सरकावर जोरदार निशाणा साधला. तसेच अजित पवारांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्याला मोठ्या प्रणाणात निधी मिळाल्याचेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. अजितदादांच्या काळात सरकार शिस्तीत चालत होते, असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis, Dhananjay Munde
मराठवाडा मुक्तिसंग्राम इतिहासातील देदीप्यमान पर्व, नव्या पिढीला माहिती देणे काळाची गरज..

मुंडे यांनी पालकमंत्री न नेमल्याने शिंदे-फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला. अजित पवार यांचे मराठवाड्यावर पहिल्यापासून प्रेम आहे, असल्याचेही मुंडे म्हणाले. अजितदादा हे जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना त्यांनी मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेतले. बीड जिल्ह्यात शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठीचा निर्णयही त्यांनीच घेतला.

Devendra Fadnavis, Dhananjay Munde
मुख्यमंत्र्यांचा सावंत, शहाजीबापूंना ‘कोल्ड शॉक’; माढा, सांगोल्याची जबाबदारी दिली आपल्या खास व्यक्तीकडे

कोरोनाचा एक काळ आपण पाहिला. त्या काळात लोक एकमेकांना घरात घेत नव्हते. मुंबईत एखाद्याचा सख्खा भाऊ काम करत असेल तरीही गावी त्याला घरात घेतले जात नव्हते. एवढा वाईट काळ आपण सगळ्यांनी पाहिला आहे. मात्र, या काळातही पवार यांनी माणुसकी जिवंत कशी राहिल याकडे लक्ष दिले. सकाळी सात वाजल्यापासून ते उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राकडे लक्ष देत होते. त्यांच्यासारख्या नेत्याच्या हाताखाली काम केल्याचा अभिमान वाटतो, असेही मुंडे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com