धनंजय मुंडे यांच्या विभागाला मिळाले एकाच दिवसात तेरा अधिकारी

२० पैकी आता १३ ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने जातपडताळणी प्रक्रियेचा वेगही वाढणार आहे. (Minister Dhnanjay Munde)
Dhnanjay Munde

Dhnanjay Munde

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : राज्यातील जिल्हानिहाय जात पडताळणी समित्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे महसूल (Maharashtra) विभागाने दिलेल्या पदोन्नती मधून एकाच दिवशी १३ अधिकारी (अध्यक्ष) मिळाले आहेत. (Marathwada)

महसूल विभागाने तात्पुरत्या पदोन्नतीची एकूण २० अधिकाऱ्यांची यादी बुधवारी (दि.२२) निर्गमित केली असून यामधून १३ अधिकाऱ्यांना विविध जिल्ह्यातील जात पडताळणी समित्यांच्या अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

राज्यात एकूण ३६ जातपडताळणी समित्या जिल्हा स्तरांवर कार्यरत असून, जवळपास २० जिल्ह्यात प्रभारी राज असल्याने जातपडताळणी प्रक्रियेस काही प्रमाणात विलंब होत होता. त्या २० पैकी आता १३ ठिकाणी पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने जातपडताळणी प्रक्रियेचा वेगही वाढणार आहे.

दरम्यान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकताच जातपडताळणीची संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत व ऑनलाईन करून पासपोर्टच्या धर्तीवर राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध असणे गरजेचे होते.

<div class="paragraphs"><p>Dhnanjay Munde</p></div>
हिंमत असेल तर अविश्वास ठराव आणा, म्हणजे आता आमच्या सोबत किती हे समजेल

धनंजय मुंडे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार व्यक्त केले असून, उर्वरित ७ समित्यांना देखील लवकरच पूर्णवेळ अधिकारी (अध्यक्ष) उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com